ETV Bharat / state

राज्यात ५,५३५ नवीन रुग्णांचे निदान, १५४ रुग्णांचा मृत्यू - maharshtra total corona news

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सध्या रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण हे गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी असले तरी दिवाळी काळात झालेली गर्दी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यात आज राज्यात आज ५,८६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

maha corona
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Nov 19, 2020, 8:14 PM IST

मुंबई - आज राज्यात ५,५३५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७,६३,०५५ वर पोहोचला आहे. राज्यात आज १५४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,३५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची सद्य स्थिती-

राज्यात आज ५,८६० रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६,३५,९७१ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १५४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण १५४ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे आठवड्यातील तर ५५ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६३,०५५ नमुने म्हणजेच १७.६९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,६०,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर ४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला एकूण ७९,७३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५ तर १७ नोव्हेंबरला २,८४० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.