ETV Bharat / state

मुंबई : 504 नवे कोरोना रुग्ण, रुग्ण दुपटीचा कालावधी 909 दिवसांवर

शनिवारी (दि. 10 जुलै) मुंबईत 504 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 मृत्यूची नोंद झाली आहे. 736 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 909 दिवसांवर पोहोचला आहे.

महापालिका
महापालिका
author img

By

Published : Jul 10, 2021, 10:15 PM IST

मुंबई - शनिवारी (दि. 10 जुलै) मुंबईत 504 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 मृत्यूची नोंद झाली आहे. 736 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 909 दिवसांवर पोहोचला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 909 दिवसांवर

मुंबईत शनिवारी (दि. 10 जुलै) 504 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 27 हजार 141 वर पोहोचला आहे. शनिवारी (दि. 10 जुलै) 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 612 वर पोहोचला आहे. शनिवारी (दि. 10 जुलै) 736 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 1 हजार 710 वर पोहोचली आहे.

मुंबईत 7 हजार 484 सक्रिय रुग्ण

मुंबईत सध्या 7 हजार 484 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 909 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 5 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 65 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी शनिवारी (दि. 10 जुलै) 37 हजार 36 तर आतापर्यंत एकूण 74 लाख 99 हजार 594 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अशी होत गेली रुग्णसंख्या कमी

1 मे रोजी 3 हजार 908, 9 मे रोजी 2 हजार 403, 10 मे रोजी 1 हजार 794, 17 मे रोजी 1 हजार 240, 25 मे रोजी 1 हजार 37, 28 मे रोजी 929, 8 जूनला 673, 10 जूनला 660, 11 जूनला 696, 14 जूनला 529, 15 जूनला 575, 16 जूनला 830, 21 जूनला 521, 22 जूनला 570, 4 जुलैला 548, 10 जुलैला 504 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारची दमदार पाऊले दिसत नाही - आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.