मुंबई - रविवारी (दि. 27 डिसें.) मुंबईत 578 नवे रुग्ण आढळून आले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 90 हजारांवर तर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 2 लाख 70 हजारांवर पोहोचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मृतांचा आकडा 11 हजारांवर
मुंबईत रविवारी (दि. 27 डिसें.) 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 7 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील मृतांचा आकडा 11 हजार 076 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 493 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 70 हजार 628 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 355 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 372 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 372, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 286 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 587 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 23 लाख 2 हजार 900 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - दिलासादायक..! कधीकाळी 'हॉटस्पॉट' असलेल्या भागातील कोरोनास्तांच्या संख्येत घट
हेही वाचा - वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस : माझा अंदाज खरा ठरला - सचिन सावंत