मुंबई - फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट आटोक्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईत 367 रुग्ण आढळून आले होते. तर बुधवारी 15 सप्टेंबर रोजी त्यात वाढ होऊन 514 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आधी 8 सप्टेंबरला 530, तर जून-जुलै दरम्यान 500 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते.
रुग्णसंख्येत वाढ -
मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. त्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात घट झाली होती. 16 ऑगस्टला सर्वात कमी 190 रुग्णांची नोंद झाली. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला 300 रुग्ण आढळून येत होते. सप्टेंबरला रुग्णसंख्या 400वर गेली. 15 सप्टेंबरला 514 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 36 हजार 284वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 16 हजार 37 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 13 हजार 174 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 4 हजार 692 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1277 दिवस इतका आहे. कोरोना रुग्ण आढळून आल्याने 37 इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 29 हजार 886 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 97 लाख 99 हजार 839 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्णसंख्येत चढउतार -
4 एप्रिलला 11,163, 7 एप्रिलला 10428, 1 मे रोजी 3908, 9 मेला 2403, 10 मेला 1794, 17 मेला 1240, 25 मेला 1037, 28 मेला 929, 14 जूनला 529, 16 जूनला 830, 21 जूनला 521, 22 जूनला 570, 4 जुलैला 548, 5 जुलैला 489, 6 जुलैला 453, 13 जुलैला 441, 2 ऑगस्टला 259, 9 ऑगस्टला 208, 16 ऑगस्टला 190, 1 सप्टेंबरला 416, 2 सप्टेंबरला 441, 3 सप्टेंबर 422, 8 सप्टेंबरला 530 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यावर्षी 1 फेब्रुवारीला 328, 2 फेब्रुवारीला 334 तर 26 जुलैला 299, 16 ऑगस्टला 190, 8 सप्टेंबरला 530 तर 15 सप्टेंबरला 514 रुग्णांची नोंद झाली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी स्थिर -
मुंबईत रुग्णसंख्या कमी असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी 18 ऑगस्टला 2058 दिवस होता. 8 सप्टेंबरला हा कालावधी 1253 दिवस इतका नोंदवण्यात आला होता. त्यात काहीशी वाढ होऊन हा कालावधी 1277 इतका नोंदवण्यात आला आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे.
हेही वाचा - CORONA VIRUS : रुग्णसंख्येत किंचित वाढ.. राज्यात ३,७८३ नवे रुग्ण, ५६ जणांचा मृत्यू