ETV Bharat / state

किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी कसारा घाट उतरले पायी - मुंबई जिल्हा बातमी

आज (24 जानेवारी) सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सकाळी 9 वाजता इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून अडीच तास पायी चालून कसाऱ्यापर्यंत आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली.

मोर्चा
मोर्चा
author img

By

Published : Jan 24, 2021, 8:53 PM IST

Updated : Jan 24, 2021, 10:09 PM IST

मुंबई - आज (24 जानेवारी) सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सकाळी 9 वाजता इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून अडीच तास पायी चालून कसाऱ्यापर्यंत आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली.

बोलताना पदाधिकारी

इगतपुरी व शहापूर तालुक्यांच्या अनेक करखान्यांसमोर सीटूच्या शेकडो कामगारांतर्फे शेतकरी जथ्याचे स्वागत करण्यात आले. कल्याण फाट्यावर माकप, सीटू, डीवायएफआय आणि अमृत वेली गुरुद्वारा यांच्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना जेवणाची पाकीटे दिली गेली. ठाणे शहरात माकप व शेकाप यांच्यातर्फे उत्साही स्वागत केले गेले. मुंबईत विक्रोळी येथे माकप, सीटू, डीवायएफआय, जमसं च्या शेकडो कार्यकर्त्यांनी महेंद्र सिंह व हेमकांत सामंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांचे स्वागत केले.

उद्या (25 जानेवारी) सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मोठी जाहीर सभा होईल. त्यानंतर राजभवनावर 50 हजारांहून अधिक शेतकरी-कामगार आणि जनतेचा विशाल मोर्चा निघेल. कॉर्पोरेटधार्जिणे असलेले तिन्ही कृषी कायदे आणि चारही श्रम संहिता रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या आणि शेतकऱ्यांसाठी रास्त हमी भावाचा कायदा करा या मुख्य मागण्या केल्या जाणार आहेत. मंगळवारी (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाला वंदन आणि राष्ट्रगाण म्हणत या कार्यक्रमाची सांगता होईल.

Last Updated : Jan 24, 2021, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.