मुंबई - महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीचा ज्या झपाट्याने विकास होत आहे, त्याच वेगाने येथील नागरी समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. त्यापैकीच एक आणि प्रमुख समस्या म्हणजेच दिवसेंदिवस
वाढत चाललेली वाहनांची संख्या आणि त्यामुळे कोलमडत चाललेली वाहतूक व्यवस्था. आज एकट्या मुंबई शहराचा विचार केला, तर सध्या मुंबईत 30 लाख 44 हजारांपेक्षा जास्त नोंदणीकृत वाहने आहेत. राज्यातल्या एकूण वाहन नोंदणीपैकी सर्वात मोठा वाटा म्हणजे 10.3 टक्के नोंदणी फक्त एकट्या मुंबई शहरात आहे. त्यामुळे वाढत्या वाहनसंख्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मुंबईत किती वाहने नोंदणीकृत आहेत? -
वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे प्रमाण वाढत असतानाच त्याच तुलनेत वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. प्रत्येकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आली आहेत. परिणामी वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या मुंबईत गंभीर झाली आहे. मुंबई शहरातील वाहन नोंदणी करण्यासाठी चार प्रादेशिक परिवहन कार्यलय आहे. वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे या प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे. दरवर्षी या चारही प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात वाहन नोंदणी केली जाते. मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये 8 लाख 38 हजार 607, वडाळा आरटीओत 7 लाख 71 हजार 770, अंधेरी आरटीओत 6 लाख 82 हजार 435 आणि बोरीवली आरटीओत 7 लाख 51 हजार 875 अशी चारही आरटीओ कार्यालयात अधिकृत 30 लाख 44 हजार पेक्षा जास्त नोंदणीकृत वाहने आहेत.
मुंबईत दुचाकी आणि चारचाकींची संख्या -
मुंबईत खासगी कार व दुचाकी वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबई दुचाकी संख्या 18 लाख 39 हजार 217 इतकी आहे. तर खासगी कारची संख्या 8 लाख 26 हजार 158 इतकी आहे. मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये 5 लाख 28 हजार 668 दुचाकी, तर 2 लाख 25 हजार 771 खासगी चारचाकी नोंदणी आहे. वडाळा आरटीओत 4 लाख 75 हजार 477 दुचाकी, 1 लाख 88 हजार 434 चारचाकी, अंधेरी आरटीओत 3 लाख 75 हजार 582 दुचाकी, तर 2 लाख 12 हजार 160 चारचाकी आणि बोरिवली आरटीओत 4 लाख 59 हजार 490 दुचाकी आणि 1 लाख 99 हजार 793 चारचाकी वाहनांची नोंदणी आहे. याशिवाय मुंबईत 48 हजार टॅक्सी तर 1 लाख 50 हजार रिक्षा आहेत. शहरात एकाद्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या रिक्षा आणि टॅक्सीसाठी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावर या गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडीमध्ये मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर -
गेल्यावर्षी टॉमटॉम टॅफिक इंडेक्सने 2020 या वर्षात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यासाठी 57 देशातील 416 शहरातील वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहराची यादीमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा दुसरा क्रमांकांवर आहे. तर पहिल्या क्रमांकावर मॉस्को हे शहर आहे.
त्याचप्रमाणे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या देशांच्या यादीत बंगळुरू सहाव्या, तर नवी दिल्ली आठव्या स्थानावर आहे. तर पुणे या यादीत 16 व्या स्थानावर आहे.
दरवर्षी किती वाहन खरेदी करतात -
- मुंबई सेंट्रल आरटीओ -
वर्ष वाहनांची संख्या
2021 30,095
2020 42,863
2019 66,440
2018 76,577
2017 66,528
एकूण वाहने 8,38,607
- वडाळा आरटीओ -
वर्ष वाहनांची संख्या
2021 30,609
2020 46,704
2019 70,001
2018 87,800
2017 70,058
एकूण वाहने 7,71,770
- अंधेरी आरटीओ -
वर्ष वाहनांची संख्या
2021 22,752
2020 33,699
2019 53,996
2018 70,549
2017 59,732
एकूण वाहने 6,82,435
- बोरिवली आरटीओ
वर्ष वाहनांची संख्या
2021 29,729
2020 43,654
2019 68,808
2018 84,652
2017 71,741
एकूण वाहने 7,51,875
हेही वाचा - स्वातंत्र्यदिनी राज्यात मंत्रालयासह तीन ठिकाणी शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न