ETV Bharat / state

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana : बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा ३ लाखांहून अधिक मुंबईकरांनी घेतला लाभ

author img

By

Published : Feb 5, 2023, 7:39 PM IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३ लाखांहून अधिक नागरिकांनी आतापर्यंत या दवाखान्याचा लाभ घेतला आहे. मुंबईत सध्या १०६ आपला दवाखाने कार्यरत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana
३ लाखांहून अधिक मुंबईकरांनी घेतला लाभ

मुंबई : मुंबईकरांना आपल्या घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने विभागवार 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु केले आहेत. या दवाखान्यात घराजवळ मोफत उपचार होत असल्याने मुंबईकरांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या दवाखान्याचा लाभ ३ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला आहे. मुंबईत सध्या १०६ आपला दवाखाने कार्यरत आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

आरोग्य केंद्र : मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर उपचार मिळावेत, त्यांचा मोठ्या रुग्णालयात जाण्याचा वेळ वाचावा आणि मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी व्हावा यासाठी पालिकेने 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र" सुरु केली आहेत. ‘पोर्टा केबीन’ आरोग्य केंद्र उपक्रमात एक डॉक्टरसह दोन नर्स उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यात ५२ आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत १०६ दवाखाने सुरु झाले आहेत. सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत ही आरोग्य केंद्रे सुरू राहणार असल्याने रात्री कामावरून घरी येणार्‍यांसाठीही हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

३ लाख लाभार्थ्यांनी घेतले उपचार : ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १ लाख तर ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख लाभार्थ्यांचा आकडा गाठण्यात आला होता. आता ३ लाख लाभार्थ्यांची संख्या पूर्ण झाली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या दवाखान्यांमधून २ लाख ८८ हजार ०२० रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १३ हजार ०५५ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.

तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांची माहिती : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन दिली जात आहे. तसेच क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी आदी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

पेपरलेस पद्धतीने कामकाज : विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

हेही वाचा : K Chandrashekar Rao in Nanded : 'जय महाराष्ट्र'चा नारा देत केसीआर यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री; म्हणाले, अबकी बार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.