ETV Bharat / state

राज्यात 19 हजार 164 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

author img

By

Published : Sep 24, 2020, 8:35 PM IST

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 19 हजार 164 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयात 2 लाख 74 हजार 993 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

मुंबई - कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढतच असून गेल्या 24 तासांत राज्यात 19 हजार 164 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 82 हजार 963 झाली आहे. राज्यात 2 लाख 74 हजार 993 सक्रिय रुग्ण आहेत. तर आज राज्यात 459 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या 34 हजार 345वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.68 टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 17 हजार 184 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 9 लाख 73 हजार 214 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47.86 टक्के आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 लाख 90‌ हजार 389 नमुन्यांपैकी 12 लाख 82 हजार 963 नमुने पॉझिटिव्ह (20.72 टक्के) आले आहेत. राज्यात 18 लाख 83 हजार 912 लोक गृह विलगिकरणात आहेत. सध्या 33 हजार 412 लोक संस्थात्मक विरगीकरणामध्ये आहेत.

हेही वाचा - सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्यसेवेतून आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांनाही नियुक्त्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.