ETV Bharat / state

बीकेसीमधल्या कोविड सेंटरमधून आतापर्यंत 12 हजारांहून अधिक रुग्ण बरे

राज्य सरकारने बीकेसीत पहिले कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आणि मेमध्ये पहिला टप्पा तर जूनमध्ये दुसरा टप्पा सुरू झाला. 2000 बेडस हे सेंटर महामारीच्या काळात आणि आता लसीकरणाच्या वेळी नवसंजीवनी ठरताना दिसत आहे. कारण या सेंटरमधून आतापर्यंत 12 हजाराहून अधिक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

more than 12,000 patients have been cured from the covid center in bkc
बीकेसीमधल्या कोविड सेंटरमधून आतापर्यंत 12 हजारांहून अधिक रुग्ण बरे
author img

By

Published : Jan 10, 2021, 7:47 PM IST

मुंबई - एप्रिलमध्ये मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आणि मुंबईतील उपलब्ध बेड्स कमी पडू लागले. राज्य सरकारने बीकेसीत पहिले कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आणि मेमध्ये पहिला टप्पा तर जूनमध्ये दुसरा टप्पा सुरू झाला. 2000 बेडस हे सेंटर महामारीच्या काळात आणि आता लसीकरणाच्या वेळी नवसंजीवनी ठरताना दिसत आहे. कारण या सेंटरमधून आतापर्यंत 12 हजाराहून अधिक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता लसीकरणातही हे सेंटर आघाडीचे ठरले आहे. कारण या सेंटरमध्ये लसीकरण केंद्र तयार होऊन येथे ड्राय रन ही पार पडली आहे.

2000 बेड्सचे सुसज्ज कोविड सेंटर -

बीकेसी येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) च्या जागेवर दोन टप्पात या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. एमएमआरडीएने 2000 बेडच्या सेंटरची उभारणी करत मुंबई महानगर पालिकेकडे सोपवले आहे. त्यानुसार आता या सेंटरचे व्यवस्थापन पालिकेकडून केले जात आहे. या सेंटरमध्ये कोविड रुग्णांवर योग्य ते उपचार देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. येथे नॉन ऑक्सिजन बेड्स 896 इतके असून ऑक्सिजन बेडची संख्या 928 इतकी आहे. तर 108 आयसीयू बेडस असून 12 बेड्स हे डायलीसीसचे आहेत. त्यामुळे हे सेंटर एका सुसज्ज रुग्णालयाप्रमाणे उभारण्यात आले असून हे सेंटर सरकारी-पालिकेच्या आरोग्य यंत्रणावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

आतापर्यंत 13585 रुग्णांवर उपचार -

मेमध्ये पहिला टप्पा आणि जूनमध्ये दुसरा टप्पा सुरू झाला. या सेंटरमध्ये तेव्हापासूनच रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच आतापर्यंत पहिला आणि दुसऱ्या टप्पामधील नॉन ऑक्सिजन-ऑक्सिजन अशा 1824 बेड्सच्या या सेंटरममध्ये 12236 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील 12023 रुग्ण आतापर्यंत ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता 246 रुग्ण सक्रिय आहे. आयसीयू बेड, डायलीसिस बेड आणि ऑक्सिजन-नॉन ऑक्सिजन असे सर्व बेड मिळून विचार केला तर आतापर्यंत येथे 13585 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र ऑक्सिजन-नॉन ऑक्सिजन बेड अंतर्गत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचा आकडा उपलब्ध होऊ शकला आहे. त्यानुसार 12023 रुग्ण बरे झाले असले तरी आयसीयू बेड-डायलसिस बेडचा विचार केला तर हा आकडा नक्कीच 13 हजाराच्या आसपास जाईल अशी शक्यता आहे.

आतापर्यंत केवळ 3 डॉक्टरांनाच कोरोनाची लागण -

कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली. यातून अगदी डॉक्टर-नर्स ही सुटले नाहीत. मुंबईत शेकडो डॉक्टर कोरोनाने संक्रमित झाले, तर काही डॉक्टरांचा यात जीव ही गेला. अशावेळी बीकेसी कोविड सेंटरमध्ये फक्त 3 डॉक्टरांनाच आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. हे विशेष. येथे रुग्णांइतकीच डॉक्टरांचीच काळजी घेतली जाते. तर महत्त्वाचे म्हणजे हे डॉक्टर हॉटेल आणि कोविड सेंटरच्या बाहेर जात नाहीत. त्यामुळे हे डॉक्टर कोरोनापासून बचावले आहेत.

लसीकरण मोहिमेत ही आघाडीवर -

बीकेसी कोविड सेंटरमध्ये 12 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन गेले आहेत. तर आता हे सेंटर लसीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. कारण या सेंटरमध्ये केवळ दीड दिवसांत लसीकरण केंद्र तयार करत त्यात 15 युनिट सज्ज करण्यात आले आहेत. तर 70 हून अधिक प्रशिक्षित डॉक्टर-नर्स-सहाय्यक लसीकरणासाठी तयार आहेत, अशी माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली आहे. त्यामुळेच जेव्हा मुंबईत ड्राय रन करण्याची वेळ आली, तेव्हा याच सेंटरची निवड करण्यात आली. तर या सेंटरमध्ये ड्राय रन यशस्वी पणे पार पडले. तेव्हा आता 16 जानेवारीपासून मुंबईत प्रत्यक्ष लसीकरण सुरू करायचे आदेश देण्यात आले तर आमची संपूर्ण टीम त्यासाठी सज्ज आहे, असा दावा डॉ. डेरे यांनी केला आहे.

हेही वाचा - चाईल्ड पॉर्न खरेदी-विक्री प्रकरणी दोघांना अटक; सीबीआयची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.