ETV Bharat / state

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे ३ हजार ७२४ जादा बसेस

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे नियोजित बस फेऱ्या व्यतिरिक्त सुमारे ३ हजार ७२४ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे १० जुलै ते १६ जुलै पर्यंत अहोरात्र कार्यरत राहतील, अशी घोषणा परिवहन व खारभूमी विकास तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

author img

By

Published : Jun 10, 2019, 8:26 PM IST

एस.टी महामंडळाच्या बसचे छायाचित्र

मुंबई - यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे नियोजित बस फेऱ्या व्यतिरिक्त सुमारे ३ हजार ७२४ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे १० जुलै ते १६ जुलै पर्यंत अहोरात्र कार्यरत राहतील, अशी घोषणा परिवहन व खारभूमी विकास तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

भाविक प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे व विठ्ठलाचे दर्शन घडवून सुखरूप घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या एसटीवर आहे. त्यासाठी जादा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस यांत्रिक दृष्ट्या सदोष, तंदुरुस्त असल्या पाहिजे तसेच त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत, याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहायला त्यांनी सांगितले आहे.
माईल्ड स्टाईलच्या १२०० आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक घडून आली होती. या बैठकीत एसटी महामंडळाच्या विविध विभागांनी यात्रेच्या दृष्टीने केलेले नियोजन सादर केले. त्यानुसार ३ हजार ७२४ बसेस पैकी, नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे १२०० आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणाऱ्या विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके सुद्धा तैनात करण्यात येणार आहेत.

यात्रा कालावधीत महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विभाग निहाय तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे. या बसस्थानकांवर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी मुलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवाशी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रदेशनिहाय जादा बसेसचे नियोजन पुढील प्रमाणे आहे

अ.क्र. प्रदेशाचे नाव सोडण्यात येणाऱ्या बसेसची संख्या
1 औरंगाबाद 1097
2 पुणे 1080
3 नाशिक 692
4 अमरावती 533
5 मुंबई 212
6 नागपूर 110

Intro:मुंबई - यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे नियोजित बस फेऱ्या व्यतिरिक्त सुमारे 3 हजार 724 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे 5 हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे 10 जुलै ते 16 जुलै पर्यंत अहोरात्र कार्यरत राहतील अशी घोषणा परिवहन व खारभूमी विकास तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. Body:भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे, विठ्ठलाचे दर्शन घडवून सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या एसटीवर आहे. त्यासाठी जादा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस या यांत्रिक दृष्ट्या निदोष, तंदुरुस्त असल्या पाहिजे तसेच त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत, याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहावे.
माईल्ड स्टईलच्या 1200 आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी
या बैठकीमध्ये एसटी महामंडळाच्या विविध विभागांनी आषाढी यात्रेच्या दृष्टीने केलेले नियोजन सादर केले. त्यानुसार 3 हजार 724 बसेस पैकी, नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे 1200 आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणाऱ्या विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.Conclusion:यात्रा कालावधीत महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विभाग निहाय तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे. बसस्थानकावर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय इ. मूलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवाशी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रदेशनिहाय जादा बसेसचे नियोजन

अ.क्र. प्रदेशाचे नाव सोडण्यात येणाऱ्या बसेस
1 औरंगाबाद 1097
2 पुणे 1080
3 नाशिक 692
4 अमरावती
533
5 मुंबई 212
6 नागपूर
110

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.