ETV Bharat / state

SIT Inquiry on Aurangzeb Status : औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नका, नाहीतर एसआयटी..., देवेंद्र फडणवीसांचा गर्भित इशारा - पावसाळी अधिवेशन

'औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्याचे उदात्तीकरण सुरू आहे. अशा लोकांवर कडक कारवाई करावी', अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. 'गरज भासल्यास या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाईल', असे फडणवीस म्हणाले.

DCM Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 2, 2023, 3:18 PM IST

मुंबई : 'काही समाजकंटकांकडून औरंगजेबाचे महिमामंडण चालू आहे. हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. तो भारतातील कोणत्याही समाजाचा हिरो नव्हता. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाईल. गरज भासल्यास यासाठी एसआयटीची देखील स्थापना केली जाईल', अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. आमदार नितेश राणे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते.

नितेश राणेंनी कारवाईची मागणी केली होती : 'औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्याचे उदात्तीकरण करण्याचे प्रकार सुरू आहेत. काही तरुण औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवत आहेत. महाराष्ट्रावर अत्याचार करणाऱ्याला हिरो म्हणून दाखवले जात आहे. हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. अशा लोकांवर कडक कारवाई करावी', अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती.

'औरंगजेब कधीही हीरो होऊ शकत नाही' : 'औरंगजेब हा या देशातील कुणाचाही नेता होऊ शकत नाही. तो मंगोल होता. इथल्या मुस्लिम समाजाशी त्याचा काही संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, महाराणा प्रताप हे हिरो होऊ शकतात, मात्र औरंगजेब भारतात कधीही हिरो होऊ शकत नाही', असे फडणवीस म्हणाले. 'जाणीवपूर्वक औरंगजेबाचे स्टेटस ठेवून दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल', असे त्यांनी सभागृहात सांगितले.

'प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे महिमामंडन करू नये' : फडणवीस पुढे म्हणाले की, जाणीवपूर्वक मुस्लिम तरुणांना भडकवले जात आहे का? याची चौकशी केली जाईल. याबाबत मला काही माहिती आहे, मात्र सभागृहात ती देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणी एटीएस आणि आयबी देखील चौकशी करत आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच प्रकाश आंबेडकरांनी देखील औरंगजेबाचे 'महिमामंडन' करू नये, असे म्हणाले.

'दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे गुन्हा आहे' : प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. हैदराबादच्या निजामाने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना आमिष दाखवले होते, पण बाबासाहेबांनी ते नाकारले. प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे महिमामंडन करू नये. औरंगजेबाच्या कबरीवर जाणे गुन्हा नाही, मात्र दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे गुन्हा आहे, असे त्यांनी सांगितले. तर आमदार अबू आझमी यांना उद्देशून, काही गोष्टीत कॉम्प्रमाईज करू नये, राष्ट्रहीत पाहावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

हेही वाचा :

  1. Supreme Court hearing on Article 370: सर्वोच्च न्यायालयात कलम 370 वर सुनावणी, घटनापीठात मुख्य न्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांचा समावेश
  2. Maharashtra Monsoon Assembly session 2023 Updates: बोलू न दिल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा सभात्याग
  3. Parliament Monsoon session live 2023: विरोधीपक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.