मुंबई - मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. राज्यासाठी एक चांगली बाब चांगली मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून रेषा राज्यात, दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत, मराठवाड्याचा काही सलग्न भागाची परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत दिली आहे.
नैऋत्य मान्सून सरासरीच्या 98 टक्के
सर्वात पहिला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर महाराष्ट्र दाखल होतो. मात्र, यावेळी 3 दिवस लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. 8 जूनपर्यंत मान्सून तळकोकणासह मुंबईत दाखल होईल. 10 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मान्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनची वाटचाल योग्य
मान्सूनची वाटचाल योग्य रीतीने सुरू आहे. अनुकूल वातावरणही तयार झाला आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण भारताचा काही भाग आणि बंगाल उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे 2, 3 दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही होसाळीकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - maharashtra unlock पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल, वाचा राज्यातील अनलॉक कसा असणार?