ETV Bharat / state

मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, पाऊस चांगला होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली होती. मात्र, आता ती प्रतिक्षा संपलेली आहे. आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. हा मान्सून दक्षिण कोकणासह दक्षिण, मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, पाऊस चांगला होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, पाऊस चांगला होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
author img

By

Published : Jun 6, 2021, 4:50 AM IST

Updated : Jun 6, 2021, 5:40 AM IST

मुंबई - मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली होती. मात्र, आता ती प्रतिक्षा संपलेली आहे. आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. हा मान्सून दक्षिण कोकसह दक्षिण, मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सर्वात पहिला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर महाराष्ट्र दाखल होतो. मात्र, यावेळी 3 दिवस लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. 8 जूनपर्यंत मान्सून तळकोकणासह मुंबईत दाखल होईल.

'पावसासाठी अनुकूल वातावरण'

10 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनची वाटचाल योग्य रीतीने सुरू आहे. अनुकूल वातावरणदेखील तयार झाले आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून, लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण भारताचा काही भाग आणि बंगाल उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच, पुढचे 2, 3 दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहीत पावसाची शक्यता आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Last Updated : Jun 6, 2021, 5:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.