मुंबई : भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाली अधिकृत घोषणा केली आहे. एक आठवडा उशिराने केरळात मान्सून दाखल झाला आहे. केरळचा काही भाग, मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच तमिळनाडूच्या काही भाग त्यानंतर कर्नाटकातील काही भागाकडे मान्सून आपला प्रवास करेल. केरळात मान्सून आल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची उत्सुकता आपल्या सर्वांना असते.
एक आठवडा उशीर : साधरण दक्षिणेकडील राज्यात मान्सून 1 जूनला येतो असतो. परंतु आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. तळकोकणात 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. गेल्यावर्षी 29 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. तर 2021 मध्ये 3 जून आणि 2020 मध्ये 1 जूनला दाखल झाला होता. 2019 मध्ये मान्सून 8 जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. यावर्षीही 8 जूनला मान्सून दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
होसळीकर यांचा अंदाज : हवामान तज्ञ कृष्णानंद होसळीकर यांनी काल मान्सून कधी दाखल होणार यांचा अंदाज वर्तवला होता. पुढील 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. त्याच्या पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. या अंदाजाबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन देखील केले होते.पेरणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी घाई करू नये. पाऊस जरी सुरुवातीला झाला तरी कृषी विभागाच्या संपर्कात शेतकऱ्यांनी,राहवे असे होसळीकर यांनी सांगितले होते.
चक्रीवादळाचा मान्सूनवर असेल प्रभाव : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात पुढील 3 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. परंतु हा पाऊस मान्सूनचा पाऊस नसेल. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. साधरण 12 जूनच्या आसपास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईल. वादळ क्षीण होऊपर्यंत मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी असेल.