दरोडेखोर आणि गावकऱ्यांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी
नाशिक - जिल्ह्यातील चांदवड शहरालगत असलेल्या खैसवाडा वस्तीवर अज्ञात ५ ते ६ लोकांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून मोरे यांना गंभीर जखमी केले. मोरे यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. दरम्यान, गावकरी आणि चोरांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2ZWEEI6
मुंबईकरांनो लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मुंबई - मुंबईत आज रेल्वे प्रशासनाकडून तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या तिन्ही मार्गांवर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. वांद्रेजवळील पादचारी पुलाचे गर्डर पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेने अप जलद मार्ग आणि अप-डाऊन हार्बर मार्गावर ५ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2DMN0bW
मी दौऱ्यावर गेलो म्हणून सरकारला दुष्काळाची आठवण झाली - शरद पवार
मुंबई - लोकसभेचे मतदान संपल्यानंतर मी लगेचच दुष्काळी दौऱयावर गेलो. त्यामुळे सरकारला दुष्काळाची आठवण झाली, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यशवंराव चव्हाण केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत दुष्काळी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठीकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2JgraAR
गडचिरोली हल्ला : त्या चालकालाही शहिदाचा दर्जा देऊन पोलिसांप्रमाणे सुविधा द्या, कुटुंबीयांची मागणी
गडचिरोली - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवानांना वीरमरण आले. तसेच वाहनाचा चालकही ठार झाला होता. आता त्या वाहन चालकालाही शहिदाचा दर्जा देऊन शहीद पोलीस जवानांप्रमाणे सुविधा द्याव्या आणि त्याच्या पत्नीला अनुकंपाची नोकरी द्यावी, अशी मागणी चालक तोमेश्वर सिंगनाथ यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2JgrSOx
अमावस्या आली... गावकरी जनावरांसह पडले गावाबाहेर, गावात शुकशुकाट
रायगड - सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी (दि.३) तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी जोपासत आहेत. गावात पूर्वी कोणतेही साथीचे रोग आल्यास संपूर्ण गाव सोडून लोक गावाबाहेर जात होते. तसेच गावात या दिवशी भुतप्रेत किंवा आत्मा फिरतात, अशी यामागे अंधश्रद्धा असल्याचे बोलले जाते. तर काहींच्या मते सर्वांनी एकत्र येण्याचे हे एक माध्यम आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2PMQQqj