ETV Bharat / state

मोदींनी अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी जाणकारांची मदत घेण्याची गरज- शरद पवार

अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी मोदींनी जाणकारांची मदत घेण्याची गरज आहे,असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. कोरोना संकटावर मात करण्यासाठी ज्या प्रकारची पावले टाकायला सगळ्यांची साथ घेतली पाहिजे त्याची कमतरता दिसते, असेही त्यांनी म्हटले.

sharad pawar
शरद पवार यांची मुलाखत भाग २
author img

By

Published : Jul 12, 2020, 10:15 AM IST

मुंबई- भारताची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू अशा किंवा डॉ. मनमोहन सिंगांसारखे लोक आहेत, त्यांच्याशी बोलले पाहिजे, असे पवार यांनी म्हटले.

देशाला आणखी एकदा मनमोहन सिंग यांच्या सारख्या व्यक्तीची शंभर टक्के गरज आहे. कारण मनमोहन सिंह अर्थमंत्री झाले तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. त्या वेळेला देश आर्थिक संकटातून जात होता. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली, असे शरद पवार यांनी सांगितले. या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले त्याचे श्रेय मनमोहन सिंग, आणि तत्कालीन पंतप्रधान नरसिंह रावांनाही देतो. या दोघांनी नेहमीच्या चौकटीचा रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाड़ी नेली आणि सबंध अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या तज्ञ लोकांची मदत घेऊन मोदी यांनी पावले टाकायला हवीत. त्यांच्या तशा कोणत्याही प्रयत्नांना देश सहकार्य करेल, असे पवार म्हणाले.

पंतप्रधानांनी इतर पक्षांच्या काही जाणकार लोकांशी बोलण्याची गरज आहे. कोरोना संकटाची व्याप्ती पाहता कुठल्या तरी एकाच पक्षाने हे सर्व आपणच सोडवून टाकू ही भूमिका घेऊन चालणार नाही. या वेळेला ज्यांची ज्यांची मदत होणे शक्य आहे, उपयुक्त आहे त्या सगळ्यांना बरोबर घेण्यासंबंधी प्रयत्न करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली. आज मोदी यांचा जो सेटअप आहे, त्या सेटअपमध्ये अनेक सहकारी असे आहेत की, त्यांना अशा प्रकारच्या कामाचा अनुभव त्यांना नाही.

कोरोनाचे म्हटले तर, आम्हालाही तसा अनुभव कुणालाही नाही. कारण असे संकट आपण कधी पाहिलेलेच नव्हते, पण या संकटावर मात करण्यासाठी ज्या प्रकारची पावले टाकायला सगळ्यांची साथ घेतली पाहिजे. त्याची कमतरता दिसते. सर्वांना सोबत घेऊनच या संकटावर मात करता येऊ शकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

निर्मला सीतारामन यांच्याशी कधी भेटही झाली नाही. त्यांची भेट सोडाच, कधी बोलणेही झालेले नाही. इतका मोठा देश, मोठी लोकसंख्या म्हटल्यावर रोज समोर असे प्रश्न उभे राहतात, देशाची अर्थव्यवस्था जेव्हा संकटात सापडते त्या वेळेला एक प्रकारचा डायलॉग इतरांसोबत पाहिजे, तो डायलॉग सध्या दिसत नाही. काही लोकांच्या कामाची हीच पद्धत असते. ती यांचीही असू शकेल असे, उत्तर शरद पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला दिले.

पूर्वी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी होते, चिदंबरम होते किंवा मनमोहन सिंग होते. त्या काळात अनेक वेळेला अन्य पक्षांच्या लोकांशी किंवा अन्य जाणकारांशी ते तासन्तास् चर्चा करत, तज्ञांची मते जाणून घेत असत. आता तशी तज्ञांची मते जाणून घेतली जातात की नाही माहीत नाही. कारण आमच्यासारख्या वेगळ्या विचारांच्या लोकांना तिथे प्रवेश आहे असे दिसत नाही.तसा जाणकारांचा सल्ला ते घेतात की नाही माहीत नाही. घेत असले तर तसे परिणाम कुठे दिसायला हवेत, तसे ते दिसतही नाहीत, असेही शरद पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.