ETV Bharat / state

दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर - सुनिल केदार - पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री

दुग्ध व्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभागांद्वारे दूध भेसळ रोखण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केदार बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, आयुक्त डॉ.पल्लवी दराडे हेही उपस्थित होते.

meeting to stop milk adulteration
दुध भेसळ रोखण्यासाठी बैठक
author img

By

Published : Feb 12, 2020, 7:59 PM IST

मुंबई - दुधातील भेसळ रोखण्यासाठी दुधाची जागेवर तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर केला जाणार आहे. यामुळे दुधाच्या दर्जाबाबत खात्री करणे शक्य होईल आणि भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसेल, असे पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

दुग्ध व्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभागांद्वारे दूध भेसळ रोखण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केदार बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, आयुक्त डॉ.पल्लवी दराडे हेही उपस्थित होते.

हेही वाचा - राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, 19 फेब्रुवारी पासून अंमलबजावणी

दुधातील भेसळ तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल व्हॅन अद्ययावत आहेत. दुधाच्या नमुन्यांची तपासणी करणे, जनजागृती करणे, महत्त्वाचे संदेश देणे, प्रात्यक्षिके अशा विविध प्रकारच्या 10 सुविधा या व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत. दुग्ध विकास विभागातील कार्यरत रसायनशास्त्रज्ञां(केमिस्ट)मार्फत दुधाची तपासणी केली जाणार आहे. यासाठी रसायनशास्त्रज्ञांना आवश्यक प्रशिक्षणही अन्न व औषध विभागामार्फत देण्यात येणार आहे, अशी माहिती सुनिल केदार यांनी दिली. अहमदनगर आणि पुणे या भागात दूध संकलन मोठ्या प्रमाणात होते. या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश केदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांचे जिल्हानिहाय संयुक्त पथक तयार करण्यात येणार आहे. पथकाच्या समन्वयाकरता जिल्हास्तरावरील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी काम पाहणार आहे. तपासणी पथकामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी, दुग्ध शाळा पर्यवेक्षकासह इतर अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. विभाग स्तरावरील समन्वयासाठी प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आणि सहआयुक्तांना आढावा घेऊन अहवाल नियमित सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.