ETV Bharat / state

नेरुळ विभाग कार्यालयावर मनसेचे 'शिट्टी-वाजवा' आंदोलन - mns did protest for municipalities negligence

नेरुळ व जुईनगर भागातील नागरिक विविध समस्येने ग्रासले आहेत. मात्र, महापालिकेचे या बाबींकडे दुर्लक्ष असल्याने मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेरुळ येथील मनपा विभाग कार्यालयावर शिट्टी-वाजवा आंदोलन करत धडक दिली. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती.

mumbai
मनसेचे शिट्टी-वाजवा आंदोलन
author img

By

Published : Dec 10, 2019, 11:28 PM IST

मुंबई - नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथील मनपा विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढा विभाग अधिकारी संजय तायडे यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती.

मनसेचे शिट्टी-वाजवा आंदोलन

गेल्या कित्येक दिवसांपासून नेरुळ व जुईनगर भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नागरी समस्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले पदपथ, गटारांची तुटलेली झाकणे, मोडकळीस आलेली गटारे, रस्त्यांवर असलेले कचऱ्याचे ढीग व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई, बंद अवस्थेतील पथदिवे व हायमास्ट, दुकानदारांनी अवैधरित्या अडवलेली मार्जिनल स्पेस, पदपथ व रस्ते अडवून बसलेले अनधिकृत फेरीवाले आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कधीही न पाहवयास मिळणारी औषध व धूर फवारणी, उद्यानांची आणि मैदानांची झालेली दुरवस्था, अनधिकृत गॅरेजेस व त्यांची रस्त्यांवरील बेवारस वाहने, रमेश मेटल क्वारी येथे नागरिकांना होणारा अपुरा पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांमुळे नागरिक बेजार झाल्याचे मनसे शहर सह-सचिव शशिकांत कळसकर व विनय कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा - शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्‍नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन

या गंभीर समस्यांकडे महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. यामध्ये कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे देखील असल्याची शंका मनसेने व्यक्त केली आहे. या समस्या येत्या १० दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास महापालिका व अधिकाऱ्यांविरोधात खळ-खट्टयाक आंदोलन करण्याचा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे व सचिव सचिन कदम यांनी दिला आहे. याप्रसंगी मनसेची आक्रमकता पाहून विभाग अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा - धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे 500 रुपये अनुदान

Intro:

मनसेचे शिट्टी-वाजवा आंदोलन
नेरुळ विभाग कार्यालयावर मनसेची धडक
नागरी समस्यांसंदर्भात विचारला जाब

नवी मुंबई:

नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथील मनपा विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढाच विभाग अधिकारी संजय तायडे यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात "या अधिकाऱ्यांचे करायचे काय
खाली डोकं वरती पाय..", "परत करा आमचे फुटपाथ, नका करू हाथ साफ...", "श्रीमंत आमची पालिका, मग रस्त्यांचे हाल का ?....", "पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे.....", "बंद करा भ्रष्टाचार
फुटपाथ वर आमचा अधिकार...." या घोषणा देऊन मनसैनिकांनी शिट्ट्या वाजवून परिसर दणाणून सोडला.

गेल्या कित्येक दिवसांपासून नेरुळ व जुईनगर विभागातील नागरिकांना विविध समस्यांनी पछाडले आहे. या नागरी समस्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले पदपथ, गटारांची तुटलेली झाकणे, मोडकळीस आलेली गटारे, रस्त्यांवर असलेले कचऱ्याचे ढीग व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई, बंद अवस्थेतील पथदिवे व हायमास्ट, दुकानदारांनी अवैधरित्या अडवलेली मार्जिनल स्पेस, पदपथ व रस्ते अडवून बसलेले अनधिकृत फेरीवाले व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कधीही न पाहवयास मिळणारी औषध व धूर फवारणी, उद्यानांची व मैदानांची झालेली दुरावस्था, अनधिकृत गॅरेजेस व त्यांची रस्त्यांवरील बेवारस वाहने, रमेश मेटल क्वारी येथे नागरिकांना होणारा अपुरा पाणी पुरवठा या व अशा अनेक समस्यांमुळे नागरिक बेजार झाल्याचे मनसे शहर सह-सचिव शशिकांत कळसकर व विनय कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या नागरी समस्यांकडे महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. यामध्ये कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे देखील असल्याची शंका मनसेने व्यक्त केली आहे. तरी या समस्या येत्या दहा दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास महापालिका व अधिकाऱ्यांविरोधात खळ-खट्टयाक आंदोलन करण्याचा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे व सचिव सचिन कदम यांनी दिला आहे.

याप्रसंगी मनसेची आक्रमकता पाहून विभाग अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

बाईट्स
गजानन काळेBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.