ETV Bharat / state

भाजपने बॅलेट पेपरवर निवडणूक जिंकावी, मी स्वतः त्यांचे अभिनंदन करेन - राज ठाकरे - raj thakare on ramayan

कलम ३७०, महाराष्ट्रातील मुख्य शहरांना आलेला महापूर, लोकसभा निवडणुका आणि जवळ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका तसेच ईव्हीएमवर राज ठाकरे यांनी भाष्य केले. भाजप आणि शिवसेनेवर चौफेर टीका पाहायला मिळाली. मुंबईत आयोजित मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

राज ठाकरे
author img

By

Published : Aug 9, 2019, 3:16 PM IST

मुंबई - ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यात यावी यासाठी काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएम विरोधी सर्व पक्षांनी एकत्र यावे म्हणुन त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सुद्धा भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) राज ठाकरे म्हणाले, ''भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुक जिंकून दाखवावी, मी स्वतः त्यांचे पुश्पगुच्छ देऊन अभिनंदन करेन'' मुंबईत आयोजित मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

कलम ३७० वर बोलताना ते म्हणाले जम्मू काश्मीरचे दोन तुकडे केल्यानंतर महाराष्ट्रातून मुंबई आणि विदर्भाला पण तोडले जाईल. तसेच महाराष्ट्रातील मुख्य शहरांना आलेला महापूर, लोकसभा निवडणुका आणि जवळ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका तसेच ईव्हीएमवर त्यांनी भाष्य केले. भाजप आणि शिवसेनेवर चौफेर टीका पाहायला मिळाली.

"३७० चे झाले, आता येतीलच मंदिर वही बनायेंगे म्हणायला. हे लोक फक्त राम भक्त म्हणून घेतात पण रामासारखे वागत नाहीत. रामायणातील किस्सा सांगताना ते म्हणाले, रामाने एका धोब्याच्या संशयावरून सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती. ईकडे देशात लाखो नागरिक ईव्हीएमवर संशय घेत आहेत तरी हे ऐकायला तयार नाहीत. हे कसले आले राम भक्त? अशा प्रकारे रामाचा दाखला देत राज यांनी ईव्हीएमवर भाष्य केले.

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प स्वतः म्हणत आहेत कि, मतदान फक्त बॅलेट पेपर वर घ्यायला हवे तर, आपण का घेत नाहीत? तसेच राज ठाकरे म्हणाले, अमेरिकेत ईव्हीएम हॅक करून दाखवले तर तिथे बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. मग आपल्याकडे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असे कसे म्हणता यईल?

ईव्हीएम विरोधी सर्वपक्षीय मोर्चा २९ ते ३० ऑगस्ट दरम्यान -

२१ ऑगस्ट रोजी होणार मोर्चा पुरामुळे तात्पुरता थांबवला असून २९ ते ३० ऑगस्ट रोजी हा मोर्चा होणार असल्याचे राज म्हणाले. यात सर्व पक्ष सहभागी होणार असून भाजपनेही सहभागी व्हावे अशी विनंती. मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसून फक्त तिरंगा झेंडा घेऊन सर्व पक्ष सहभागी होतील. सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून तयारीला लागावे. आपला खळ्खट्याक बाजूला ठेऊन नम्रपणाने घरोघरी जाऊन लोकांशी संवाद करावा व ईव्हीएम विरोधी मोहीमेचा फॉर्म भरुन घेण्याचे त्यांनी कार्यकर्त्याला सांगितले.

कर्नाटक किस्सा -

२९ मे ला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५०९ जागांवर काँग्रेस तर ३३६ जागांवर भाजप जिंकून आले. ही निवडणुक बॅलेट पेपरवर झाली होती. यातून असे दिसते की, भाजप फक्त ईव्हीएमवर निवडून येते. १० दिवसातच कशी काय भाजपची पीछेहाट होते? असा सवाल त्यांनी केला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.