मुंबई MNS on Marathi Patya : राज्यभरात असलेल्या विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठी फलक (Marathi Patya) लावावे या आग्रही मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आंदोलन करत आहे. मुंबई महानगरपालिकेला मनसेनं अल्टीमेटम दिला आहे. मुंबई महानगरपालिकेनंही सर्व दुकानदारांना याबाबत नोटिसा बजावून दोन महिन्यात सर्व पाट्या बदलाव्यात आणि मराठीत कराव्यात असे आदेश दिले होते. ही मुदत आज संपत आहे. त्यामुळं जर उद्या कुठे मुंबई महानगरपालिका हद्दीत किंवा राज्यात अन्य ठिकाणी मराठी फलक दुकानांवर अथवा आस्थापनांवर नसतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलमध्ये 'खळ्ळ-खट्याक' होणारच असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
कुर्ला चांदीवलीत आंदोलन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज चांदीवली परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. काही दुकानांवर अजूनही मराठी फलक नाहीत, याचा तीव्र निषेध करत आजचा दिवस शांततेत आंदोलन करण्यात आलं. उद्या मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेचे चांदीवली विभाग प्रमुख महेंद्र भानुषाली यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.
शिवसेनेचीही आंदोलनात उडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंही आता मराठी पाट्यांच्या संदर्भातील आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. परत विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय चौधरी (MLA Ajay Chaudhary) यांनी लालबाग परळ भागात फिरून मराठी पाट्या असलेल्या दुकानदारांना थेट इशारा दिला आहे. जर या पाट्या दोन दिवसात बदलल्या नाही तर शिवसेनाही जोरदार आंदोलन करून पाट्या उतरवायला लावेल असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी दिला आहे.
हेही वाचा -
- Marathi Boards on Shops : दुकानांवरील मराठी पाट्यांमुळे व्यापारावर परिणाम- व्यापारी संघटनेचा अजब दावा
- दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यावर कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू
- Raj Thackeray on Marathi Signboards : दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, राज ठाकरे म्हणाले, मूठभर व्यापाऱ्यांनी...