मुंबई - उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मात्र, याप्रकरणी दोन दिवसातच वाद सुरू झाले आहे. आरपीजी समूहाचे मालक हर्ष गोएंका यांनी या विमानतळाबाबत केलेल्या ट्विट केलेल्या एका व्हिडिओ वादंग निर्माण झाले आहे. फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेले आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिला.
व्हिडिओ व्हायरल -
१७ जुलैला हर्ष गोयंका यांनी ‘मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद’ अशी कॅप्शन लिहून तिथे सुरू असलेला एक गरबा व्हीडिओ ट्विट केला. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानी समूहाकडे देण्यात आला आहे. त्याच निमित्ताने हर्ष गोयंका यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओत काही तरूण-तरूणी मास्क घालून गुजरातमधील पारंपारिक नृत्य गरबा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. यामुळे वाद निर्माण झालेला आहे.
-
Mumbai airport celebrating the takeover by Gujarat! pic.twitter.com/w38xHXm8UF
— Harsh Goenka (@hvgoenka) July 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai airport celebrating the takeover by Gujarat! pic.twitter.com/w38xHXm8UF
— Harsh Goenka (@hvgoenka) July 17, 2021Mumbai airport celebrating the takeover by Gujarat! pic.twitter.com/w38xHXm8UF
— Harsh Goenka (@hvgoenka) July 17, 2021
मनसेने देखील या वादात उडी घेत थेट अदानी ग्रुपला इशारा दिला आहे. मुंबई विमानतळावरून जीव्हीकेचे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'आवाज' हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या, असेही सरदेसाई म्हणाले.
हेही वाचा - जाणून घ्या, काय आहे राज कुंद्राचे 'डर्टी पिक्चर'?
कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवले -
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवले आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये, असे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.