ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाआघाडी, मनसेने बांधली मोट, एकत्र मिळून देणार उमेदवार - maharashtra assembly election 2019

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने पुण्यातील कोथरूड येथून उमेदवारी जाहीर केले असून त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस, मनसे आणि स्वाभिमान शेतकरी संघटना या पक्षांनी मोट बांधली आहे. लवकर एका तगड्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे.

चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Oct 1, 2019, 11:46 PM IST

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने पुण्यातील कोथरूड येथून उमेदवारी जाहीर केले आहे. त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस, मनसे आणि स्वाभिमान शेतकरी संघटना या पक्षांनी मोट बांधली आहे. पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षांचा मिळून एकच उमेदवार देण्यात येणार आहे. त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ, उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध

भाजपने चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूड येथे उमेदवारी जाहीर केली असल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक विविध संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. तर कोथरूड या मतदार संघात असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांना पाडण्यासाठी त्या ताकदीचा उमेदवार देण्यासाठी दोन्ही बाजूंनी नावे समोर आणले आहेत. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांना कोथरूड येथून उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. कोथरूड येथे चौधरी यांना उमेदवारी दिल्यास येथील मोठा वर्ग त्यांच्या बाजूने उभा राहील, असा अंदाज महाआघाडीतील नेत्यांनी बांधला आहे. तर दुसरीकडे मनसेकडून एका तगड्या उमेदवाराचे नाव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीतील प्रमुख नेत्यांना सांगण्यात आले असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो.

हेही वाचा - मनसेची पहिली यादी जाहीर, वरळीतून उमेदवारीचा निर्णय राज ठाकरे घेतील

त्यामुळे मनसे आपला उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभे करून आपली ताकद आजमावण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही कोथरूड येथे ब्राह्मण समाजाचा एक उमेदवार पाहून ठेवला आहे. ऐनवेळी महाआघाडीतील इतर पक्षाशी विचारणा करून तो उमेदवार देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. यामुळे कोथरूड येथे उभे राहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना महाआघाडी आणि मनसेचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Intro:चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाआघाडी, मनसेने बांधली मोट, एकत्र मिळून देणार उमेदवार

mh-mum-01-bjp-kothrud-patil-candidate-7201153

(फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. १:

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपाने पुण्यातील हडपसर येथून उमेदवारी जाहीर केले असून त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि स्वाभिमान शेतकरी या संघटनांनी मोट बांधली आहे. पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षांचा मिळून एकच उमेदवार देण्यात येणार आहे. त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
भाजपाने चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यातील हडपसर येथे उमेदवारी जाहीर केली असल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक विविध संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. तर हडपसर या मतदार संघात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांना पाडण्यासाठी त्या ताकदीचा उमेदवार देण्यासाठी दोन्ही बाजूनी नावे समोर आणले आहेत. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी आणि ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांना हडपसर येथून उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी माहितीही दिली आहे. हडपसर येथे चौधरी यांना उमेदवारी दिल्यास येथील मोठा वर्ग त्यांच्या बाजूने उभा राहील असा अंदाज महा आघाडीतील नेत्यांनी बांधला आहे. तर दुसरीडे मनसेकडून एका तगड्या उमेदवाराचे नाव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीतील प्रमुख नेत्यांना सांगण्यात आले असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. त्यामुळे मनसे आपला उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभे करून आपली ताकद अजमावण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही हडपसर येथे ब्राह्मण समाजाचा एक उमेदवार पाहुन ठेवला असे असून ऐनवेळी महा आघाडीतील इतर पक्षाशी विचारणा करून तो उमेदवार देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. यामुळे हडपसर येथे उभे राहणाऱ्या चंद्रकांत दादा पाटील यांना महा आघाडी आणि मनसेचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Body:चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाआघाडी, मनसेने बांधली मोट, एकत्र मिळून देणार उमेदवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.