ETV Bharat / state

MNS Lok Sabha Preparation: इंजिन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात.. अमित ठाकरेंसह मनसे नेत्यांच्या 'या' मतदारसंघात नियुक्त्या - अमित ठाकरे पुणे लोकसभा

मनसेने लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीनं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणूक दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. अमित ठाकरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली आहे. तर, बाबू वागस्कर यांना शिरूर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

MNS Lok Sabha Preparation
मनसेचं इंजिन लोकसभेच्या मैदानात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 10:17 PM IST

मुंबई MNS Lok Sabha preparation - 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एका बाजूला देशातील सर्व विरोधी पक्ष इंडिया या बॅनरखाली एकत्र आले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारदेखील येत्या विशेष अधिवेशनात 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकी आधी कोणत्याही निवडणुका होऊ शकत नाहीत, अशी एक चर्चा सध्या राजकीय वातावरणात पाहायला मिळते. अशा परिस्थितीत मनसेदेखील सक्रिय झालीय.

हीप बोनच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी राज ठाकरेंना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला. या काळात राज ठाकरेंनी पक्ष संघटनेच्या बांधणीवर जोर दिला. विश्रांतीच्या काळात राज ठाकरे यांनी विभागानुसार बैठका बोलवल्या. त्यांच्या कामाचे अहवालदेखील मागवले होते. त्यानुसार काहींची उचलबांगडी केली. तर काही ठिकाणी फेरनियुक्त केल्या आहेत. तेव्हापासून पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा लावलेला सपाटा अद्यापदेखील सुरू आहे. सध्या राज ठाकरे लोकसभा निहाय विभागाच्या बैठका घेत आहेत. पहिल्या फळीतील नेत्यांना विभागनिहाय जबाबदाऱ्या राज ठाकरे यांनी आता वाटून दिल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचे हे शिलेदार आता लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन निवडणुकांच्यादृष्टीने कामे करणार आहेत.

कोण कुठल्या मतदासंघात?

  • वसंत मोरे - बारामती
  • अमेय खोपकर - मावळ
  • बाळा नांदगावकर - छत्रपती संभाजीनगर
  • संदीप देशपांडे - रायगड
  • किशोर शिंदे - नाशिक
  • राजू पाटील - कल्याण
  • अविनाश जाधव - ठाणे, पालघर, भिवंडी (ग्रामीण)
  • नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे - दक्षिण मध्य मुंबई
  • अविनाश आंबेडकर - उत्तर मुंबई
  • योगेश परुळेकर, शालिनी ठाकरे, संदीप देशपांडे - उत्तर दक्षिण मुंबई

राजकीय परिस्थितीला एक संधी म्हणून पहा- एका बाजूला महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला महायुती आहे. त्यात शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट आहेत. या गट-तटामध्ये महाराष्ट्राच्या जनतेत मोठा संभ्रम आहे. हा संभ्रमच अनेक पक्षांना संधी वाटत आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीला एक संधी म्हणून पहा, असं राज ठाकरे नेहमीच सांगत आले आहेत. त्यादृष्टीने राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरलेली पाहायला मिळते.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.