ETV Bharat / state

'श्रीरामाचा वनवास संपला, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मंगलमय क्षणांपैकी एक उद्याचा क्षण' - राम मंदिर भूमीपूजन बातमी

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही. ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरू असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं. ते प्रतीक आहे कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच या क्षणाचं महत्व वेगळं आहे. या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Aug 4, 2020, 9:57 PM IST

मुंबई : जवळपास 3 दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता. त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला, उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमीपूजन होणार. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिर भूमीपूजनावर व्यक्त केली.

रामजन्मभूमी अयोध्या येथे उद्या (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही. ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरू असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं. ते प्रतीक आहे कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच या क्षणाचं महत्व वेगळं आहे. तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला. आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो, की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, असे राज ठाकरे यांवेळी म्हणाले.

या क्षणी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता, अशी भावनादेखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली. सध्या कोरोनाचं संकट आहे. पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे. असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त करत तमाम हिंदू बांधवांचे देखील अभिनंदन केले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.