ETV Bharat / state

मनसेची पहिली यादी जाहीर, वरळीतून उमेदवारीचा निर्णय राज ठाकरे घेतील - MNS

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 27 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मनसेचे चिन्ह
author img

By

Published : Oct 1, 2019, 7:28 PM IST

Updated : Oct 1, 2019, 10:04 PM IST

मुंबई - मनसेची पहिली यादी आज (मंगळवार) जाहिर झाली असून त्यात 27 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात महत्त्वाच्या नेत्यांना स्थान दिले असले तरी पहिल्या यादीत वरळी विधानसभेत कोणाच नाव जाहीर केले नाही. यामुळे मनसे वरळीतून उमेदवार देणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

बोलताना बाळा नांदगावकर

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहिम मतदारसंघातून संदीप देशपांडे, मागाठाणेतील नयन कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर सोमवारी मनसेत आलेल्या आत्महत्याग्रस्त धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना शिंदखेडा व दिलीप दातीर यांना नाशिकमधून उमेदवारी दिली आहे.

मनसेचे अधिकृत यादी
मनसेचे अधिकृत यादी

आज पहिली यादी जाहीर केली असून उद्यापासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील. वरळीतून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असले तरी उमेदवार द्यायचा आहे, त्याबाबत अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील असे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.

मनसेचे अधिकृत यादी
मनसेचे अधिकृत यादी

यांना मिळाली येथून उमेदवारी

  • कल्याण ग्रामीण - प्रमोद रतन पाटील
  • कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
  • नाशिक पूर्व - अशोक मुर्तडक
  • माहिम - संदीप देशपांडे
  • हडपसर - वसंत मोरे
  • कोथरूड - अॅड. किशोर शिंदे
  • नाशिक मध्य - नितीन भोसले
  • वणी - राजू उंबरकर
  • ठाणे - अविनाश जाधव
  • मागाठाणे - नयन कदम
  • कसबा पेठ - अजय शिंदे
  • सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील
  • नाशिक पश्चिम - दिलीप दातीर
  • इगतपूरी - योगेश शेवरे
  • चेंबूर - कर्णबाळा दुनबळे
  • कलिना - संजय तुर्डे
  • शिवाजीनगर - सुहास निम्हण
  • बेलापूर - गजानन काळे
  • हिंगणघाट - अतुल वंदिले
  • तुळजापूर - प्रशांत नवगिरे
  • दहिसर - राजेश येरूणकर
  • दिंडोशी - अरूण सुर्वे
  • कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे
  • गोरेगांब - विरेंद्र जाधव
  • वर्सोवा - संदेश देसाई
  • घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
  • वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

मुंबई - मनसेची पहिली यादी आज (मंगळवार) जाहिर झाली असून त्यात 27 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात महत्त्वाच्या नेत्यांना स्थान दिले असले तरी पहिल्या यादीत वरळी विधानसभेत कोणाच नाव जाहीर केले नाही. यामुळे मनसे वरळीतून उमेदवार देणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

बोलताना बाळा नांदगावकर

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहिम मतदारसंघातून संदीप देशपांडे, मागाठाणेतील नयन कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर सोमवारी मनसेत आलेल्या आत्महत्याग्रस्त धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना शिंदखेडा व दिलीप दातीर यांना नाशिकमधून उमेदवारी दिली आहे.

मनसेचे अधिकृत यादी
मनसेचे अधिकृत यादी

आज पहिली यादी जाहीर केली असून उद्यापासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील. वरळीतून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असले तरी उमेदवार द्यायचा आहे, त्याबाबत अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील असे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.

मनसेचे अधिकृत यादी
मनसेचे अधिकृत यादी

यांना मिळाली येथून उमेदवारी

  • कल्याण ग्रामीण - प्रमोद रतन पाटील
  • कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
  • नाशिक पूर्व - अशोक मुर्तडक
  • माहिम - संदीप देशपांडे
  • हडपसर - वसंत मोरे
  • कोथरूड - अॅड. किशोर शिंदे
  • नाशिक मध्य - नितीन भोसले
  • वणी - राजू उंबरकर
  • ठाणे - अविनाश जाधव
  • मागाठाणे - नयन कदम
  • कसबा पेठ - अजय शिंदे
  • सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील
  • नाशिक पश्चिम - दिलीप दातीर
  • इगतपूरी - योगेश शेवरे
  • चेंबूर - कर्णबाळा दुनबळे
  • कलिना - संजय तुर्डे
  • शिवाजीनगर - सुहास निम्हण
  • बेलापूर - गजानन काळे
  • हिंगणघाट - अतुल वंदिले
  • तुळजापूर - प्रशांत नवगिरे
  • दहिसर - राजेश येरूणकर
  • दिंडोशी - अरूण सुर्वे
  • कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे
  • गोरेगांब - विरेंद्र जाधव
  • वर्सोवा - संदेश देसाई
  • घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
  • वांद्रे पूर्व - अखिल चित्रे
Intro:स्वर्गीय आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार - बजरंग सोनवणे


बीड- ज्यांनी स्वतःच्या स्वर्गीय आईने दिलेला शब्द सत्तेसाठी पाळला नाही ते मतदारांशी व भाजपा शी काय प्रामाणिक राहणार? असा सवाल करत जे आधी पासूनच आतून भाजपचे होते ते आज उघड गेले तर नवल काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी मुंदडा परिवारावर निशाणा साधला. सोमवारी मुंदडा परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जिल्हापरिषद निवडणूकीत तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्याने राष्ट्रवादीचा उमेदवार पाडण्यासाठी केलेल्या फोनच्या रेकाॅर्डिंग उपलब्ध आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत कोणी कधी हात वरी केला ते ज्ञात आहे, लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याविरोधात केलेल्या पोस्ट आहेत, लोकसभा प्रचारा दरम्यान केलेली भाषणे कोणत्या आशयाची होती त्याचे व्हिडीयो आहेत, मतदाना दिवशी अंबाजोगाईत काय झाले हे पाहिले, २३ मे रोजी लोकसभेचा निकाल पूर्णपणे जाहीर झाला ही नव्हता तोच दुपारी इफ्तार पार्टीचे निमंत्रण जात होते. राष्ट्रवादीच्याच विधानसभेच्या उमेदवारातर्फे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याच्या खुशीत दुसऱ्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करावे का? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभेचा निकाल लागून महिना पण झाला नव्हता तोच मतदारसंघातील कार्यक्षम पदाधिकार्यांचे द्वेशापोटी राजीनामे घेतले व नवनियुक्त्या केल्या. त्यानंतर झालेल्या पंचायत समिती पोटनिवडणूकीत उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी हे नवनियुक्त पदाधिकारी किंवा त्यांचे नेते उपस्थित का नव्हते? हा प्रश्न कोणी विचारणार नाही पण उगाच माहिती न घेता मॅनेज झाल्याचे आरोप करायचे. मा.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ती जागा काॅंग्रेसला सोडण्यात आली अन् त्यासाठी तुम्ही जिल्हाध्यक्षांना दोषी ठरवता? आपली आमदारकी वाचवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून कोण कोणासोबत तडजोडी करत होत हे सामान्यांना माहित नसेल पण जाणकारांना नक्की माहित आहे असे सोनवणे म्हणाले.

एक दुसऱ्यावर चिखलफेक-
केज विधानसभा मतदार संघात मागील दोन दिवसात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुंदडा परिवार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी जोरदार निशाणा साधत मुंदडा परिवाराचे राष्ट्रवादी वरील बेगडी प्रेम असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे अक्षय मुंदडा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आम्हाला पवार साहेबा पासून तोडले आहे. असा गंभीर आरोप अक्षय मुंदडा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.Body:बीडConclusion:बीड
Last Updated : Oct 1, 2019, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.