ETV Bharat / state

MNS Criticized MVA Government : अस्वच्छ समुद्रकिनारे, मनसेची महाविकास आघाडी सरकारवर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्रातील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी 11 डिसेंबरला 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' सुरू करण्यात आली आहे. ( MNS Beach cleaning Campaign ) यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ( MNS Criticized MVA Government Over Beach Cleanliness )

Beach cleaning campaign
समुद्र किनारा स्वच्छता मोहीम
author img

By

Published : Dec 11, 2021, 3:38 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतील मध बेट, अक्सा बीच आणि दाना बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. ( MNS Beach Cleaning Campaign ) या स्वच्छता अभियानातंर्गत मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने समुद्रकिनारी जाऊन कचरा गोळा केला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ( MNS Criticized MVA Government Over Beach Uncleanliness )

मनसे पदाधिकारी याबाबत बोलताना

मनसेची सरकारवर टीका -

महाराष्ट्र सरकारमध्ये एक युवा मंत्री आहेत. ज्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय आहे. त्यांनी महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू केली होती. मात्र, आज समुद्रकिनारी सर्वाधिक प्लास्टिक आढळून येत आहे. या सरकारने कोरोनाच्या वेळी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा नारा दिला होता. त्याच पद्धतीने स्वच्छता मोहिमेपासून सरकार मागे हटल्याचे दिसून येत आहे, अशी टीका मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

हेही वाचा - Nawab Malik Tweet : गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, नवाब मलिकांचं नवीन ट्वीट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यात समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी एक विशेष मोहिम राबवली जात आहे. मनसेने यासाठी सामान्य नागरिकांनीही त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी 11 डिसेंबरला 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' सुरू करण्यात आली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे या मोहिमेतंर्गत स्वतः शिवाजी पार्क येथे येऊन स्वछता करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.