ETV Bharat / state

...अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा - मंदिरं सुरू करण्याबाबत राज ठाकरे

सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदूजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

MNS chief raj thackeray  temple reopening maharashtra  corona effect on temple  raj thackeray on temple reopening  मंदिरं सुरू करण्याबाबत राज ठाकरे  कोरोनाचा मंदिरांवर परिणाम
...अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
author img

By

Published : Sep 3, 2020, 12:02 PM IST

मुंबई - राज्य शासनाने नुकतीच अनलॉक 4 ची घोषणा केली. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. सरकारने मंदिर उघण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरण शिथिल करणे हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे, की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाही? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनलॉक' प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत. मॉल्स उघडले, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवालदेखील राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं. आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असताना नेमकं महाराष्ट्रातच मंदिरं का बंद ठेवली जात आहेत? मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते, तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी असू द्या, अशी सूचनादेखील राज ठाकरे यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी, गोपाळकाल्याचा उत्सव, गणेशोत्सव साजरा करताना राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचे सामंजस्य दाखवले आहे. सरकारच्या आदेशांचे अत्यंत समजूतदारपणाने पालन केले आहे. त्यामुळे उद्या मंदिरं उघडली, तर या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आहे, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

मंदिरं सुरू करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांपुरता हा विषय मर्यादित नाही. इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो याचा सरकार विचार करणार आहे की नाही? मध्यंतरी माझ्याकडे त्र्यंब्यकेश्वर मंदिराचे पुजारी आले होते, त्यांनी हीच व्यथा माझ्याकडे मांडली. एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच कोलमडणार असेल तर त्यांनी साकडं घालायचं कोणाकडे?

गेले ५ महिने सगळं अर्थकारण ठप्प आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय पार बुडालेत. त्यामुळे आतातरी सरकारने निर्बंध शिथिल करून, सार्वजनिक वाहुतकीचं नीट नियोजन करून या अर्थकारणाला धुगधुगी द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. या लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जव केली, टाहो फोडला. पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय. त्यामुळे 'देव तारी त्याला कोण मारी' या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे. देवा या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव, असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.