ETV Bharat / state

शिवसेना नगरसेविका मोटेकर यांच्यावर 'टक्केवारी'चा मनसेने केला आरोप - मीना फडतरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे नवनवे घोटाळे बाहेर काढण्याचा धडाका मनसेने लावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी वॉर्ड क्रमांक 156 मध्ये महिला बचत गट आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून लाखो रुपयांची वसुली केली असल्याचा आरोप केला आहे

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Nov 9, 2021, 3:22 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे नवनवे घोटाळे बाहेर काढण्याचा धडाका मनसेने लावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी वॉर्ड क्रमांक 156 मध्ये महिला बचत गट आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून टक्केवारी घेत लाखो रुपयांची वसुली केली असल्याचा आरोप केला आहे.

दरमहिन्याला चेक दिले

या घोटाळ्याच्या संबंधित असलेल्या संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा मीना फडतरे यांच्याकडून नगरसेविका माटेकर यांनी महिन्याला 89 हजार रुपयांचा धनादेश घेतला आहे. तसेच संघर्ष महिला विकास संस्थाही त्यांनी हडप केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. फडतरे यांनीही या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून आपण स्वतः दरमहिन्याला चेक दिले असल्याचे सांगितले आहे.

60 ते 90 टक्के कमीशन आम्हाला पाहिजे

मीना सुभाष फडतरे या संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आहेत. पूर्वी नगरसेवकांच्या सांगण्यानुसार संस्थेला दत्तक वस्ती योजनेचे काम दिले जात होते. नंतर लॉटरी पद्धत सुरू करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक 156 येथे मीना फडतरे यांना हे काम मिळाले. काम मिळाल्यानंतर या ठिकाणी असलेले ननगरसेविका वारंवार बोलवायला लागले. महानगरपालिकेकडून येणारे पेमेंट दर महिन्याला येते त्यातून ६० ते ९० टक्के कमीशन आम्हाला पाहिजे, नाहीतर काम करायला देणार नाही. वॉर्ड ऑफिसरला सांगून तुमची संस्था काळ्या यादीत टाकू, अशी धमकी देण्यात आली. यानंतर जबरदस्तीने चेकवर स्वतःच्या भावाच्या आणि नगरसेविकेच्या दीराच्या नावाने चेक बनवण्यात आले असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

कारवाई करण्यासाठी अजून काय पुरावा द्यायचा

नगरसेविका अश्विनी नाटेकर यांचे दीर संजय परशुराम माटेकर यांच्या नावावर हे धनादेश देण्यात आले या संबंधित असलेले बँकेचे स्टेटमेंटही पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आले. या प्रकरणी 20 ऑक्टोबर, 2020 रोजी तक्रार करण्यात आली होती. मात्र, अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई करण्यासाठी अजून काय पुरावा द्यायचा, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

कोण आहेत अश्विनी माटेकर..?

2017 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिकिटावर अश्विनी माटेकर यांनी निवडणूक लढवली होती. या ठिकाणी त्यांचा विजयही झाला होता. 2018 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आठ पैकी सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापैकी अश्विनी माटेकर या एक आहेत.

हे ही वाचा - उद्या सकाळी दहा वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्डशी असलेलं नात उघड करणार - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.