ETV Bharat / state

नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले

author img

By

Published : Oct 27, 2019, 6:05 PM IST

चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर येथून एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांच्याकडून आंदोलनाचा दणका देताच आठ दिवसात पूल सुरू करण्याचे ठोस आश्वासन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक

मुंबई- चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर येथून एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांच्याकडून आंदोलनाचा दणका देताच आठ दिवसात पूल सुरू करण्याचे ठोस आश्वासन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. प्रियदर्शनी पुलाजवळ असलेल्या ज्या जेसीबी मशिनीवर नवाब मलिक आणि त्यांचे कार्यकर्ते उभे होते. त्याच मशिनीवर येऊन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांशी फोनवरून बोलून हे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक

आज सकाळी साडेदहा वाजता एव्हरार्ड नगर येथून एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर परिसरात जमा झाले होते. मात्र, त्यापूर्वीच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चुनाभट्टी येथील पूलाच्या जवळ येण्यापूर्वीच त्यांना प्रियदर्शनी पुलाजवळ अडवण्यात आले. तसेच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते व आमदार नवाब मलिक यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, आम्ही येत्या आठ दिवसात हा पूल सुरू करू, असे स्पष्ट आश्वासन एमएमआरडीएने मलिक यांना दिले. त्यानंतर मलिक यांनी आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मागील अनेक दिवसांपासून तयार असूनही या पुलाचे उद्घाटन होत नव्हते. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी या पुलाचे उद्घाटन करून हा पूल सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्याला एमएमआरडीए प्रशासन घाबरले. चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर ते एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणारा हा पूल आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी पुलाचे काही काम सुरू झाले होते. परंतु, मागील पाच वर्षात या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने झाले. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर या पुलाचे पूर्ण काम झाले होते. मात्र, त्याचे उद्घाटन झाले नसल्याने मलिक यांनी या पुलामुळे स्थानिकांना प्रचंड वाहतुकीचा त्रास होत असल्याने आपण याचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा तीन दिवसांपूर्वी दिला होता.

हेही वाचा- शिवसेना राबवणार पालिका पॅटर्न; शिवसेनेला 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा

मलिक यांच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेत प्रशासनाने हा पूल येत्या आठ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या आंदोलनापूर्वी या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर, पुलाचे उद्घाटन करण्यात येऊ नये म्हणून या ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी सिमेंटचे मोठे ठोकळे लावण्यात आले होता. तर, दुसरीकडे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या पुलाच्या जवळ येऊ नये याची खबरदारी पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आले होती.

हेही वाचा- मुंबईत दिवाळी पहाट उत्साहात साजरी

Intro:नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले!

आठ दिवसात पूल सुरू करण्याचे दिले आश्वासन

mh-mum-01-ncp-mmrda-bridge-byte-vjij-7201153

मुंबई, ता. २७:

चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर येथून एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले.
आज सकाळी आंदोलनाचा दणका देताच त्याच्या आठ दिवसात हा फुल सुरू करण्याचे ठोस आश्वासन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून या आंदोलनादरम्यान देण्यात आले.येथे ठेवण्यात आलेल्या जेसीबी मशीनवर नवाब मलिक आणि त्यांचे कार्यकर्ते उभे होते, त्याच मशीनवर येऊन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यानी एमएमआरडीएचे आयुक्तांना फोनवरून बोलून हे आश्वासन दिले.
रविवारी सकाळी साडेदहा वाजता या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर आणि या परिसरात जमा झाले होते. मात्र त्यापूर्वीच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चुनाभट्टी येथील या पूलाच्या जवळ येण्यापूर्वीच त्यांना प्रियदर्शनी च्या पुलाजवळ अडवण्यात आले. व त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते व आमदार नवाब मलिक यांना हे आंदोलन मागे घ्यावे, आम्ही येत्या आठ दिवसात हा पूल सुरू करू असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मलिक यांनी आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचे यावेळी जाहीर केले.
मागील अनेक दिवसांपासून तयार असूनही त्याचे उद्घाटन होत नव्हते, त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी या फुलाची उद्घाटन करून हा पूल सुरू करण्याचा इशारा दिला होता त्या इशाऱ्याला एमएमआरडीए प्रशासन घाबरले.

चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर ते एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणारा हा पूल आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी त्याचे काही कामे सुरू झाले होते,परंतु मागील पाच वर्षात या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने झाले विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर या पुलाचे पूर्ण काम झाले होते, मात्र त्याचे उद्घाटन झाले नसल्याने मलिक यांनी या पुलामुळे स्थानिकांना प्रचंड वाहतुकीचा त्रास होत असल्याने आपण याचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा तीन दिवसांपूर्वी दिला होता. त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेत प्रशासनाने हा पूल येत्या आठ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या यांच्या आंदोलनाला पूर्वी या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर पुलाचे उद्घाटन करण्यात येऊ नये,म्हणून या ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी सिमेंटचे मोठे ठोकळे आणून तो अडवण्यात आला होता. तर दुसरीकडे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या पुलाच्या जवळ येऊ नये याची खबरदारीही पोलिस यंत्रणेकडून घेण्यात आले होती.

Body:नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले!Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.