ETV Bharat / state

मेट्रो 3 मधील 29 वे ब्रेक थ्रू यशस्वी; मिठी नदीखालील 1.5 किमीचे भुयारीकरण पूर्ण

एमएमआरसीकडून 29 वे ब्रेक थ्रू यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. बीकेसी ते धारावी असा हा भुयारीकणाचा टप्पा या ब्रेक थ्रूमुळे पूर्ण झाला आहे. मिठी नदीच्या खालील भुयारीकरणाचे आव्हानात्मक काम कोरोना-लॉकडाऊनच्या संकटात यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.

author img

By

Published : Aug 19, 2020, 9:34 PM IST

metro breakthrough
मेट्रो 3 मधील 29 वे ब्रेक थ्रू यशस्वी

मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पातील एक महत्वाचा टप्पा आज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने पूर्ण केला आहे. आज एमएमआरसीकडून 29 वे ब्रेक थ्रू यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. बीकेसी ते धारावी असा हा भुयारीकरणाचा टप्पा या ब्रेक थ्रूमुळे पूर्ण झाला आहे. मिठी नदीच्या खालील भुयारीकरणाचे आव्हानात्मक काम कोरोना-लॉकडाऊनच्या संकटात यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. 29 व्या ब्रेक थ्रूमुळे मेट्रो 3 प्रकल्पातील 85 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

मेट्रो 3 मधील 29 वे ब्रेक थ्रू यशस्वी

मेट्रो 3 चा सुमारे 33.5 किमीचा मार्ग पूर्णतः भुयारी मार्ग आहे. मुंबईसारख्या शहरातील भुयारीकरणाचे काम सोपे व्हावे, यासाठी अत्याधुनिक अशा टीबीएम अर्थात टनेल बोरिंग मशीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मुंबईच्या भूगर्भात भल्यामोठ्या 17 टीबीएम मशीन सोडण्यात आल्या आहेत. या मशीन 52 (येणारी-जाणारी मार्गिका) किमीचे भुयारीकरण पूर्ण करणार आहेत. एक-एक भुयारीकरणाचा टप्पा पार करत टीबीएम मशीन मुंबईच्या पोटातून बाहेर येत आहेत. 29 वे ब्रेक थ्रू अर्थात भुयारीकरणाचा टप्पा पार करत टीबीएम बाहेर आले आहे.

टेराटॅक निर्मित गोदावरी-४ या टीबीएम मशीनने हे ब्रेक थ्रू पुर्ण केले आहे. यात बीकेसी ते धारावी पर्यंतचे १.५ किमी अंतर पूर्ण करण्यात आले आहे. बीकेसी येथील लाँचिंग शाफ्टपासून २१ ऑगस्ट २०१९ रोजी गोदावरी-४ या टीबीएम मशीनचे काम चालू करण्यात आले. धारावीपर्यंत १,०४३ आरसीसी रिंग्ससह भुयारीकरण पुर्ण करण्यात आले. “मिठी नदी खालील भुयारीकरण मेट्रो-३ प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक होते. मुंबईतील गुंतागुंतीची भौगोलिक रचना, भूगर्भातील पाण्याची उच्च पातळी शिवाय कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या मर्यादा यामुळे हे काम अधिकच कठीण झाले होते. मात्र, आमच्या टीमने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पार पाडले याचा आनंद आहे” असे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले आहे.

मार्च महिन्यात गोदावरी-३ ने बीकेसी ते धारावीपर्यंत १.५ किमी डाऊन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण केले होते. बीकेसी ते धारावी पर्यंतच्या एकूण ३ किमी (अप आणि डाऊनलाइन) पैकी ४८४ मीटर अंतर भुयार मिठी नदीच्या पात्राखाली आहे. दरम्यान धारावी, बीकेसी, विद्यानगरी व सांताक्रूझ स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-५ ने संपूर्ण ८ किमी लांबीचे भुयार पूर्ण केले आहे. या 29 व्या ब्रेक थ्रूमुळे आता प्रकल्पाचे आतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५% भुयारीकरण आणि एकूण ५९% बांधकाम पूर्ण केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.