ETV Bharat / state

एमएमआरमधील घरांच्या विक्रीत 62 टक्क्यांनी घट - मुंबई घर विक्री बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका घरे खरेदी-विक्री व्यवसायालाही बसला आहे. मागील आर्थीक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या आर्थीक वर्षातील पहिल्या तिमाहीत तब्बल 62 टक्क्यांनी घरांची विक्री कोसळली आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Jul 29, 2020, 1:03 PM IST

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हे घरविक्री-खरेदीचे हॉटस्पॉट मानले जाते. दरवर्षी येथे सर्वाधिक घरे बांधली जातात तर सर्वाधिक घरे विकली जातात. पण, यंदा मात्र कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका घरखरेदी-विक्रीला बसला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत 62 टक्क्यांनी घरांच्या विक्रीत घट झाली आहे. त्यातही मुंबई शहरात केवळ 204 घरे एप्रिल ते जून, 2020 दरम्यान विकली गेली आहेत. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2019) जिथे 17 हजार 151 घरे विकली गेली होती, तिथे यावर्षी पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2020) केवळ 6 हजार 346 घरांची विक्री झाली आहे. थेट 62 टक्क्यांनी घरांची विक्री कमी झाल्याने मालमत्ता बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे.

लियासिस फोरस या मालमत्ता बाजारपेठेतील आघाडीच्या सर्व्हेक्षण कंपनीच्या अहवालातून एमएमआरमधील घरांच्या विक्रीत पहिल्या तिमाहीत 62 टक्क्यांनी घट झाल्याची बाब समोर आली आहे. या अहवालानुसार मुंबई शहरात एप्रिल ते जून 2019 मध्ये 563 घरे विकली गेली होती तिथे एप्रिल ते जून 2020 मध्ये फक्त 204 घरे विकली गेली आहेत. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत 85 टक्क्यांनी विक्री घटली आहे. पश्चिम उपनगराचा (वांद्रे ते दहिसर) विचार करता येथे गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत 2 हजार 168 घरे विकली गेली असताना यंदा हा आकडा 869 वर अडकला आहे.

मध्य उपनगरात (सायन ते मुलुंड) गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत 1 हजार 760 घरे विकली गेली होती. तर यंदा केवळ 538 घरांची विक्री झाली आहे. ठाण्यात 2 हजार 284 घरांची विक्री गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत झाली होती. मात्र, यंदा 1 हजार 50 घरेच पहिल्या तिमाहीत विकली गेली आहेत. नवी मुंबईत गेल्या वर्षी 2 हजार 289 घरांची विक्री झाली होती तर यंदा 346 घरांची विक्री झाली आहे. मिरारोड ते विरारदरम्यान 5 हजार 385 घरांची विक्री झाली होती. तिथे यंदा 2 हजार 210 घरे विकण्यात आली आहेत. कल्याण ते भिवंडी दरम्यान 1 हजार 728 घरे विकली गेली होती तिथे यंदा 885 घरे विकली गेली आहेत. त्याचवेळी पनवेलमध्ये 1 हजार 74घरांची विक्री झाली असताना यंदा 294 घरे विकली गेली आहेत.

मुंबई शहरात सर्वाधिक 85 टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबईत 83 टक्क्यांनी तर पनवेलमध्ये 73 टक्क्यांनी घट झाली आहे. एमएमआरमधील एकूण घट 62 टक्के अशी आहे. कोरोना आणि टाळेबंदीमध्ये विक्री पूर्णपणे बंद आहे. घर खरेदी करणाऱ्या वर्गातील नोकऱ्या गेल्याने आणि पगारात कपात झाल्याने अनेकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी घरविक्री मंदावली असून आता बिल्डरांची धाकधूक मात्र वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.