ETV Bharat / state

पालिका रेल्वे प्रशासनाचे पुन्हा एकमेकांकडे बोट पुलाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न

पुलाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी सर्वस्वी पालिकेची असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे

पूल
author img

By

Published : Mar 15, 2019, 12:10 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी अंधेरी येथील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर सीएसएमटीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाचे पालिकेकडून ऑडिट करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी केवळ किरकोळ डागडुजी करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आज पूल कोसळल्यावर पुन्हा एकदा रेल्वे आणि पालिका प्रशासन कोणतीही नैतिक जबाबदारी न स्वीकारता एकमेकांकडे बोट दाखवत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९८४ ला रेल्वेने त्यांच्या हद्दीत कल्याणच्या दिशेला पादचारी पूल बांधला. तर १९९० साली पालिकेने या पुलाचा पुढपर्यंत विस्तार केला. सदर पूल आमच्या हद्दीत नसून पालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी सर्वस्वी पालिकेची असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर नुकतेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, सदर पुल रेल्वेचाच आहे. मनपा केवळ या पुलाची देखरेख करते. आम्ही दुरुस्तीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, रेल्वेने परवानगी दिली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Intro:पालिका रेल्वे प्रशासनाचे पुन्हा एकमेकांकडे बोट
पुलाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न
मुंबई - गेल्या वर्षी अंधेरी येथील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर सीएसएमटीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाचे पालिकेकडून ऑडिट करण्यात आले होते. मात्र त्यावेळी केवळ किरकोळ डागडुजी करण्याची गरज असल्याचे त्यावेळी त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र आज पूल कोसळल्यावर पुन्हा एकदा रेल्वे व पालिका प्रशासन कोणतीही नैतिक जबाबदारी न स्वीकारता एकमेकांकडे बोट दाखवत आहे. Body:मिळालेल्या माहितीनुसार, 1984 साली रेल्वेने त्यांच्या हद्दीत कल्याणच्या दिशेला पादचारी पूल बांधला. तर 1990 साली पालिकेने या पुलाचा पुढपर्यंत विस्तार केला. Conclusion:सदर पूल आमच्या हद्दीत नसून पालिकेच्या हद्दीत आहे, त्यामुळे पुलाच्या दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी सर्वस्वी पालिकेची असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर नुकतेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माध्यमांना विधान केले की, सदर पूल रेल्वेचाच आहे, मनपा केवळ देखरेख करते. आम्ही दुरुस्तीसाठी परवानगी मागितली होती मात्र रेल्वेने दिली नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.