ETV Bharat / state

MLC Election : नागपूर अन् अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात होणार निवडणूक

विधान परिषदेच्या दोन प्राधिकारी मतदार संघांच्या आज (दि. 10) निवडणुका ( MLC Election ) होणार आहेत. नागपूर व अकोला-वाशिम-बुलडाणा या मतदारसंघात मतदान होणार असून यापूर्वी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 10, 2021, 7:05 AM IST

मुंबई - विधान परिषदेच्या दोन प्राधिकारी मतदार संघांच्या आज (दि. 10) निवडणुका ( MLC Election ) होणार आहेत. नागपूर व अकोला-वाशिम-बुलडाणा या मतदारसंघात मतदान होणार असून यापूर्वी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.

बिनविरोध झालेल्या जागा

बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे एक आणि नंदुरबारच्या एक जागेचा समावेश आहे. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस तर अकोला-वाशिम-बुलडाणा येथे शिवसेना विरुद्ध भाजप लढत होत आहे. यापूर्वीच कोल्हापूरमधून भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. धुळ्यामध्ये भाजपचे अमरिश पटेल हे बिनविरोध होत आहेत. मुंबईमध्ये बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजपाचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची वर्णी लागली आहे.

नागपूर येथे ऐनवेळी काँग्रेसने अपक्ष उमेदवारास जाहिर केला पाठिंबा

गेल्या दोन दिवसांपासून ज्या गोष्टीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्या चर्चेला अखेर विराम मिळालेला असून भाजपामधून आयात केलेले काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार रवींद्र उर्फ छोटू भोयर यांच्या ऐवजी ऐनवेळी कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार असलेल्या मंगेश देशमुख ( Mangesh Deshmukh ) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress President Nana Patole ) यांनी हा निर्णय घेतला आहे. ऐनवेळी घडलेल्या घटनेमुळे काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला 'पंजा' ऐवजी अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाससमोर मतदान करण्याची वेळ आली आहे. यामुळे भाजपचे तगडे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांना नवा चेहरा असलेल्या मंगेश देशमुख हे काँग्रेसच्या मदतीने कितपत टक्कर देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अकोला-वाशिम-बुलडाणा मतदार संघात वंचित किंगमेकर ठरण्याची शक्यता

भाजपाकडून वसंत खंडेलवाल तर शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया (MLA Gopikishan Bajoria) यांच्यामध्ये सामना होत आहे. या दोघांकडे विजयाचा दावा असला तरी भाजपाकडे तीनशे मतदार आहेत. तर महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) चारशेच्यावर मतदार आहे. मात्र या दोघांनाही वंचित बहुजन आघाडीच्या (vanchit bahujan aaghadi) मतदारांची विजयासाठी गरज भासणार आहे. परिणामी, हे दोन्ही उमेदवार वंचितचे मतदार मिळविण्यासाठी जोर लावत आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अद्यापही कोणत्या उमेदवाराला मतदान करावे, असा आदेश काढलेला नसल्याने या दोघांच्याही विजयाचा जोर सध्या नमलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजयासाठी वंचितच निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा - Nana Patole on Farmers agitation : मोदी सरकारचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने जुमला ठरू नयेत - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.