मुंबई : राष्ट्रीय आमदार संमेलनाचे आयोजन मुंबई येथील जिओ सेंटर येथे करण्यात आले होते. या संमेलनाला राज्यातील विविध पक्षातील आमदार सामील झाले होते. आज या संमेलनाचा समारोप होता. यावेळी राज्यपाल रमेश बैस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय विधेयक संमेलन पुढील वर्षी गोवा येथे होणार असल्याचाही जाहीर झाल्यानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढील वर्षी अधिवेशनासाठी सर्वांनी गोव्यात यावे, असे आवाहन केले.
पुढच्या वर्षी गोव्याला या: मुख्यमंत्री प्रमोद सावंतगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय विधायक संमेलन पुढील वर्षी गोवा येथे होणार असल्याची माहिती दिली. लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी अशा प्रकारचे राष्ट्रीय आमदार संमेलन राबवावे लागतात. या प्रकारचे संमेलन म्हणेज अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुढच्या वेळी राष्ट्रीय विधायक संमेलन हे गोव्यात होणार आहे. गोव्यात आम्ही सर्वांचे स्वागत करतो. कार्यक्रमाची नियोजन आणि तयारी चोख केली जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान मुंबईत पार पडलेल्या आमदार संमेलनाविषयी संजय कोरडिया म्हणाले की, आम्हाला या संमेलनाचा भरपूर फायदा होणार आहे. आपल्या मतदारसंघातील जनतेशी कशाप्रकारे नाते अधिक घट्ट करता येईल. संसदीय कामकाजात कोण-कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयीचा मार्गदर्शन या संमेलनात मिळाले.
कार्यक्रमाचा समारोप : समारोपाच्या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व मीरा कुमार, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे, डॉ. विश्वनाथ कराड, निमंत्रक डाॅ. राहुल कराड व विविध राज्यांचे पीठासीन अधिकारी आणि आमदार उपस्थित होते. देशातील १ हजार ९०० आमदारांना प्रथमच एका व्यासपीठावर आणण्याचे काम एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने करण्यात आले होते.
हेही वाचा-