ETV Bharat / state

Mithi River Mumbai : मिठी नदीवरुन आरोप-प्रत्यारोप; श्वेतपत्रिका काढण्याची ठाकरे गटाची मागणी तर भाजपने मांडली 'ही' भूमिका - आमदार योगेश सागर मिठी नदी

मुंबईतील पुराचे नेहमीच तेथील मिठी नदीवर (Mithi River) खापर फोडले जाते. पावसाळा आला की मिठी नदीवरुन राजकारण तापलेले दिसून येते. आताही तसेच सुरू आहे. मिठी नदीच्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Mla Sunil Prabhu on Mithi River) यांनी केली आहे. तर मिठी नदीबाबत नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे मत भाजप आमदार योगेश सागर (Mla Yogesh Sagar on Mithi River) यांनी व्यक्त केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 21, 2023, 8:12 PM IST

Updated : Jul 21, 2023, 9:27 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार सुनील प्रभु-आमदार योगेश सागर

मुंबई - मागील सतरा वर्षात मुंबईतील मिठी (Mithi River) नदीच्या विकासकामांवर हजारो कोटी खर्च करूनही अद्यापही परिस्थितीत काही सुधारणा नसल्याने हा विषय फार चर्चेचा झाला आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये दरवर्षी (Mla Sunil Prabhu on Mithi River) पावसाळयात हा मुद्दा चर्चेचा असतो. परंतु, आता या संदर्भामध्ये ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी श्वेतपत्रिका काढण्याची (Mla Yogesh Sagar on Mithi River) मागणी केली आहे.

मिठी नदीच्या पुनर्जीवितेचे काम - २६ जुलै २००५ च्या मुंबईतील महापुरानंतर मुंबईत 'मिठी' नावाची नदी आहे, याचा साक्षात्कार जनतेला झाला. गेल्या १७ वर्षात आतापर्यंत मिठी नदी गोड करण्याच्या नावावर मुंबई महानगरपालिका व एमएमआरडीएने १३०० कोटी रुपये खर्च करूनही त्याचे सौंदर्यकरण पूर्ण झालेले नाही. त्यात मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण याचाही समावेश आहे. याशिवाय अतिरिक्त १ हजार कोटी विविध कामांसाठी खर्च केले जाणार असून या दोन्ही प्राधिकरणाने मिठीसाठी बहुतांश कामे केली असली तरीसुद्धा आजतागायत मिठी नदीला प्रदूषणापासून मुक्ती भेटली नाही.

श्वेतपत्रिका काढावी - मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराला पावसाळ्यात पुरापासून वाचविण्यासाठी मिठी नदीच्या पुनर्जीवितेचे काम तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असली तरी शासन या दरबारी उदासीनच दिसत आहे. मिठी नदीच्या सौंदर्यकरणावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू असून आता या प्रकरणी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.

प्राधिकरणाची स्थापना - २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुरानंतर त्यातून बोध घेत शासनाने १९ ऑगस्ट २००५ रोजी शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाची स्थापना केली. त्यानुसार १७.८४ किमी लांबीच्या मिठी नदीपैकी फिल्टरपाडा, पवई ते सीएसटी पूल, कुर्ला दरम्यानची ११.८४ किमी लांबीची विकास कामे मुंबई महानगरपालिकेतर्फे तसेच सीएसटी पूल ते माहीम कॉजवे दरम्यानची ६ किमी लांबीची व वाकोला नाल्याच्या १.८ किमी लांबीची विकास कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मिठी नदी व विकास संरक्षण प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनांतर्गत २ टप्प्यांमध्ये करण्यात येत आहेत. यामध्ये रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत व सुशोभीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे. मिठी नदी कामाच्या पहिल्या टप्प्यात मिठी नदीचे १६ ते ६० मीटर रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम एप्रिल २००६ ते जून २००६ दरम्यान पूर्ण करण्यात आले असून त्या कामाकरिता ३१.८८ कोटी इतका खर्च करण्यात आला होता.

५९० कोटी इतका खर्च - सन २००७ ते २०१९ दरम्यान चितळे समिती केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान संस्था आणि आयआयटी मुंबई यांनी सादर केलेल्या अहवाल/ शिफारशीनुसार तसेच मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण यांच्या मान्यतेप्रमाणे मिठी नदीचे रुंदीकरण व खोलीकरण, संरक्षण भिंत बांधणे व सेवा रस्ता बांधणे इत्यादी बहुतेक कामे करण्यात आलेली असून सदर कामांकरिता सुमारे ५९० कोटी इतका खर्च करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उर्वरित कामे मिठी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प गट क्रमांक दोन अंतर्गत प्रगतीपथावर असल्याचे म्हटले आहे

मिठी नदीच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा - मिठी नदीच्या प्रश्नावर बोलताना भाजप नेते, मुंबईचे आमदार योगेश सागर यांनी म्हटले आहे की, मिठी नदीबाबत नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. मिठी नदीच्या पुराने मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. परंतु त्यावर वैज्ञानिक व वैधानिक पद्धतीने माहिती घेऊन सखोल काम करणे गरजेचे आहे. पण असे न केल्यामुळे आजही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. मिठी नदीचा पूर्ण पट, आजूबाजूचा परिसर, तिथे झालेले अतिक्रमण हे मुक्त केले पाहिजे. परंतु सध्याच्या प्रशासनामध्ये तो दम नसल्याचं सांगत योगेश सागर यांनी उबाठा गटावर टीका केली आहे. मिठी नदीच्या बाजूचे अतिक्रमण मुक्त केल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने सध्या पावसाची पद्धतही बदलली आहे. पंधरा.. पंधरा दिवसात पडणारा पाऊस तीन तासात पडत आहे. म्हणूनच वैज्ञानिक व वैधानिक पद्धतीने काम केले तरच मिठी नदीचा उपयोग होईल, अन्यथा मिठी नदीचा पैसा समुद्रात वाहून जाईल, असा टोलाही योगेश सागर यांनी लगावला आहे. योगेश सागर यांच्या या आरोपाला उबाठा गटाचे नेते आमदार सुनील प्रभू यांनी प्रत्युत्तर देताना आतापर्यंत मिठी नदीवर झालेल्या खर्चाचे ऑडिट करावे फक्त आरोप करू नयेत, असे म्हटले आहे. जर इतकचं असेल तर मिठी नदीच्या कामाबाबत श्वेतपत्रिका समोर आणावी, अशी मागणी ही सुनील प्रभू यांनी केली आहे..

मिठी नदीबाबत नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. मिठी नदीच्या पुराने मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. परंतु त्यावर वैज्ञानिक व वैधानिक पद्धतीने माहिती घेऊन सखोल काम करणे गरजेचे आहे. पण असे न केल्यामुळे आजही अशी परिस्थिती निर्माण होते - योगेश सागर, आमदार, भाजपा

आतापर्यंत मिठी नदीवर झालेल्या खर्चाचे ऑडिट करावे, फक्त आरोप करू नयेत - सुनील प्रभू, आमदार, ठाकरे गट

मुंबईतील सर्वात मोठी नदी - २००५ साली मुंबईत आलेल्या महापुरानंतर इतकी वर्षं मुंबईत ‘नाला’ म्हणून प्रचलित असलेला काळाकुट्ट जलप्रवाह प्रत्यक्षात ‘मिठी नदी’ असल्याचा एकाएकी साक्षात्कार सर्वांना झाला. मिठी नदी ही वास्तविक मुंबईतील सर्वात मोठी नदी असली तरी तितकीच मोठ्या प्रमाणात प्रदूषित असणारी नदी आहे. मिठी नदीची लांबी तब्बल २५ किमी असून ही नदी विहार तलावात उगम पावत असून विहार तलाव - साकी नाका - कुर्ला - कलिना - वाकोला - वांद्रे-कुर्ला संकुल - धारावी - माहीम अशा खाडीमार्गे गेल्यानंतर ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. मुंबईतल्या दहिसर, पोयसर, ओशिवरा या तीन नद्यांपेक्षा ही नदी आकाराने आणि लांबीने सर्वांत मोठी असून विहार आणि पवई तलावातील पाणी या नदीत प्रवेश करते.

सर्वात प्रदूषित नदी - आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांमधील यंत्रांच्या साफसफाईनंतरचे दूषित पाणी हे मिठी नदीत सोडले जाते. मिठी नदीच्या प्रदूषित पाण्यानेच प्राण्यांना आंघोळही घातली जाते. तेल, केमिकल्स ड्रम्सची साफ सुद्धा मिठी नदीत केली जात असल्याने सुद्धा ही नदी सर्वाधिक प्रदूषित होत चालली आहे. मुंबईत मिठी नदीच्या लगत झोपडपट्ट्यांचे प्रमाणही लक्षणीय असून त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील कचरा, मेलेली जनावरे याच नदीपात्रात टाकली जात असल्याने या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते.

हेही वाचा -

  1. CM Eknath Shinde on Mithi River : मुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईची पाहणी, त्रुटी आढळल्यास कठोर कारवाईचे दिले आदेश
  2. Aaditya Thackeray Vs Nitesh Rane : दोन तरुण आमदारांमध्ये वाकयुद्ध; कोण जाणार जेलमध्ये?
  3. Balasaheb Thorat On Manipur violence : मणिपूरमधील घटना माणुसकीला काळीमा फासणारी - बाळासाहेब थोरात

Last Updated : Jul 21, 2023, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.