मुंबई - भाजपने आपल्या पक्षात राष्ट्रवादीचे अनेक संस्थानिक नेते, राजे खेचून घेतले. मात्र, प्रजा राष्ट्रवादीसोबतच आहे. हे भाजपच्या लक्षात आल्याने त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीच्या माध्यमातून राजकीय खेळी केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते व आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे.
हेही वाचा - पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले ? मुख्यमंत्र्यांसमोरच म्हणाले....
आमदार गजभिये म्हणाले की, भाजपने राष्ट्रवादीतील राजे आणि नेते भाजपमध्ये नेले असले तरी प्रजा ही तिकडेच आहे. हे लक्षात आल्यानंतर भाजपने मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार यांची मुळे कोणी हलवू शकत नाही. सोने वितळल्यानंतर पुन्हा झळाळी घेते. त्याप्रमाणे शरद पवारही ईडीच्या प्रकरणातून सही सलामत बाहेर येतील, असे गजभिये म्हणाले.
हेही वाचा - मोटारमनच्या प्रसंगावधनामुळे वाचले जखमी प्रवाशाचे प्राण
ज्यांचा सहभाग हा त्या बँकांच्या कोणत्याही प्रकरणात नाही. साधे ते कुठे संचालक नाहीत, तरीही त्यांना का गोवण्यात आले? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भाजप सरकारने अगोदर राष्ट्रवादीतील मातब्बर नेते आपल्याकडे घेतले. संस्थांनिक घेतले आणि त्यानंतरही फायदा होत नाही, असे लक्षात आल्याने त्यांनी हा प्रकार घडवून आणला, असल्याचे गजभिये म्हणाले.