ETV Bharat / state

Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणे यांचा मोठा दावा

आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. दुसरीकडे त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मुंबईचा मुद्दा आठवतो, असेही म्हटले आहे.

नितेश राणे संजय राऊत टीका
Nitesh Rane On Sanjay Raut
author img

By

Published : May 7, 2023, 10:48 AM IST

Updated : May 7, 2023, 2:59 PM IST

नितेश राणे

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार असल्याचा दावा केला आहे. राणे म्हणाले, की उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे राऊत हे राष्ट्रवादीत येणार आहेत. राऊतांनी घेतलेल्या भूमिका लक्षात घ्या, असेही ते म्हणाले. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलत होते.

संजय राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर- नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १० जून पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. उद्धव ठाकरे यांचे आता काही खरे नाही. त्यांचा पक्ष राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्यात काही अर्थ राहिलेला नाही, म्हणून माझा राष्ट्रवादीत प्रवेश तुम्ही घ्या, अशी विनंती संजय राऊत हे शरद पवारांना करत असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून शरद पवार हे संजय राऊत यांचा फोन सुद्धा घेत नाहीत, हेही त्यांनी सांगितले आहे.

आम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंना सांगत होतो हा साप आहे. तुम्ही सापाला दूध पाजत राहिला. ते बाळासाहेबांचा होऊ शकला नाही, उद्धव ठाकरे यांचे काय होणार? त्यांनी बाळासाहेब व राज ठाकरे यांचे भांडण लावले. उद्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, तेव्हा यांचा खरा चेहरा उद्धव ठाकरेंना समजेल, असेही राणे म्हणाले. नितेश राणे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे.

उद्धव ठाकरे यांचा पवारांना फोन नाही - एका कार्ट्यामुळे किती लोकांना तोडत तोडत तुम्ही कुठे गेला आहेत. पवार साहेबांनी राजीनामे दिला तेव्हा स्टॉलिन, राहुल गांधी सर्व नेते मंडळींनी पवार यांना फोन करून राजीनामा देऊ नका, अशी विनंती केली. पण मला एक अशी तरी बातमी दाखवा की उद्धव ठाकरेंनी पवार साहेबांना फोन केला. तुम्ही राजीनामा देऊ नका, असे त्यांनी सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

डावोसचा खर्च कोणाकडून? सामनाच्या रोखठोकमधून आज पंतप्रधानांवर टीका करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या प्रचारासाठी लोकांचा पैसा वापरला जातो त्याचा हिशोब दिला जात नाही. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री डावोसला गेले होते. ते एकटे नव्हते. डावोसला संमेलन झाल्यानंतर सुट्टीसाठी ते तिथे राहिला होते. ते कोणाच्या पैशावर गेला होते. त्याच्याबरोबरच्या लोकांची तिकिटाचे पैसे कोणी दिले. वरुण सरदेसाई नावाचा सरकारी भाचा कोणाच्या पैशावर मजा मारत होता. उद्धव ठाकरे आजारी असताना हे तिथे फिरत होते. त्यांच्या खर्च कोणी दिला? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला.

दिशा सालियन फाईल ओटीटीवर- सध्या सुरू असलेला द केरला स्टोरी हा चित्रपट संजय राऊत चालत नाही. दिशा सालियन फाईल लवकरच ओटीटीवर येणार, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. द केरला स्टोरी चालत नाही, ना मग ही स्टोरी बघा. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात माजी पर्यटन मंत्री युवा नेते, आदित्य ठाकरे यांचे नाव सातत्याने राणे कुटुंबियांकडून पुढे आणले जात आहे. त्याच अनुषंगाने नितेश राणे यांनी हे वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी कलानगर बंद करून दाखवावे.. मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांना बारसू येथील कातळ शिल्प दिसले नाही. मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर पडले नाहीत. एकनाथ शिंदे साहेब ओरडबन ओरडुन बोलत होते की, आपण काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत नाही. तर भाजप सोबत जाऊ. ते ऐकले नाही. आता महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात. मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देतो की, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जोरावर फक्त मुंबई बंद करून दाखवा. मुंबई नको तर उद्धव ठाकरेंनी त्याच्या जोरावर फक्त कलानगर बंद करून दाखवावे.

Last Updated : May 7, 2023, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.