ETV Bharat / state

'उपऱ्यां'मुळेच भूमिपुत्रांच्या घरात संपत्ती - आ. जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Sep 18, 2019, 7:22 PM IST

कळव्यातील बॅनरबाजीवर आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

हेच ते बॅनर

मुंबई - कळव्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना "उपऱ्या", असे संबोधत अनेक बॅनर आगरी सेनेतर्फे लावून भूमीपुत्र आमदार निवडून द्या, असे आवाहन मतदारांना करण्यात आले होते. या आव्हानाला आज आ. जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिले. कळवा मुंब्रा या पट्ट्यातील लोकवस्ती पाहता बहुसंख्य जनता ही नोकरी धंद्यानिमित्त बाहेरून आलेली आहे. त्यांना जर उपरे म्हणाल तर याच उपऱ्यांमुळे भूमिपुत्रांच्या घरात धनसंपत्ती असल्याचे त्यांनी सुनावले.

ही बॅनरबाजी आगामी निवडणुकांना समोर ठेऊन केलेली आहे. त्याला आपण काडीचीही किंमत देत नाही, उलट असले बॅनर लावणाऱ्यांच्या बौद्धिकतेची तपासणी करावी लागेल, असा खोचक टोला त्यांनी लगावला. अशी बॅनरबाजी करून समाजात तेढ निर्माण करून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न मतदारच हाणून पाडतील, असे भाकीत देखील त्यांनी वर्तविले. आपण या टीकेला आणि बॅनर्स ना गंभीरतेने घेत नसून जातीचे कार्ड खेळू पाहणाऱ्यांसमोर आपले माणुसकीचे कार्ड केव्हाही सरस ठरेल असे त्यांनी ठणकावले.

Intro:"उपऱ्यां" मुळेच भूमिपुत्रांच्या घरात संपत्ती.. आपलं एकच माणुसकीचे कार्ड.. आव्हाडांचे "उपऱ्या" बॅनर ला सडेतोड उत्तर.. Body:
कळव्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना "उपऱ्या" असे संबोधत अनेक बॅनर आगरी सेनेतर्फे लावून भूमीपुत्र आमदार निवडून द्या असे आवाहन मतदारांना करण्यात आले होते. या आव्हानाला आज जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिले. कळवा मुंब्रा या पट्ट्यातील लोकवस्ती पाहता बहुसंख्य जनता ही नोकरी धंद्या निमित्त बाहेरून आलेले असून त्यांना जर उपरे म्हणाल तर याच उपऱ्यांमुळे भूमिपुत्रांच्या घरात धनसंपत्ती असल्याचे त्यांनी सुनावले. सदर बॅनरबाजी ही आगामी निवडणुकांना समोर ठेऊन केलेली असून त्याला आपण काडीची किमत देत नाही उलट असले बॅनर लावणाऱ्यांच्या बौद्धिकतेची तपासणी करावी लागेल असा खोचक टोला त्यांनी लगावला.. असली बॅनरबाजी करून समाजामध्ये तेढ निर्माण करून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न मतदारच हाणून पाडतील असे भाकीत देखील त्यांनी वर्तविले. आपण या टीकेला आणि बॅनर्स ना गंभीरतेने घेत नसून जातीचे कार्ड खेळू पाहणाऱ्यांसमोर आपले माणुसकीचे कार्ड केव्हाही सरस ठरेल असे त्यांनी ठणकावले.
BYTE - जितेंद्र आव्हाड (आमदार NCP)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.