ETV Bharat / state

'महानगरपालिकेच्या ठेवी मोडून मुंबईतील पूरग्रस्तांना सरकारने मदत करावी'

कोरोनाने संपूर्ण मुंबईत हाहाकार माजला असताना उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे एकदाही उपनगरात फिरकलेले नाहीत. तसेच, मागील ८ महिन्यांत जिल्हा नियोजनाची बैठक सुद्धा घेतलेली नाही. एकीकडे कोरोना आणि आता बेसुमार पावसामुळे मुंबईकरांचे बेहाल होत असताना ठाकरे सरकार मात्र मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून ताजबरोबर पर्यटनाचे करार करण्यात मग्न आहे, अशी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालयासमोर मोर्चा

author img

By

Published : Sep 28, 2020, 8:17 PM IST

मुंबई - कोरोना महामारीमध्ये राज्य सरकारने एका रुपयाचीही मदत मुंबईकरांना केली नाही. 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनसुद्धा कोणत्याही प्रकारची मदत जनतेला करण्यात आलेली नाही. पण पुढे सर्व कष्टकरी कामगारांना 10 हजाराची आर्थिक मदत करावी, आदी मागण्या घेऊन आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता.

आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये तसेच अतिवृष्टीच्या संकटामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झाली आहे. मुंबईत अनेक ठिकणी कोरोना व बेसुमार पावसामुळे घरांवर तुळशीपत्र ठेवावे लागत आहे. मुंबईकरांच्या घराचे तत्काळ नजर पंचनामे करून घरटी 10 हजार रुपयांची मदत करावी व झोपडपट्टीवासी, चाळीतील रहिवासी, रिक्षाचालक, घरगुती काम करणाऱ्या महिला, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा सरसकट 10 हजारांची मदत करण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी आज कांदिवली येथील तलाठी कचेरीवर काढलेल्या मोर्चाच्या वेळी बोलताना केली.

कोरोनाने संपूर्ण मुंबईत हाहाकार माजला असताना उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे एकदाही उपनगरात फिरकले नाहीत. तसेच, मागील ८ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक सुद्धा घेतलेली नाही. एकीकडे कोरोना आणि आता बेसुमार पावसामुळे मुंबईकरांचे बेहाल होत असताना ठाकरे सरकार मात्र मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून ताजबरोबर पर्यटनाचे करार करण्यात मग्न आहे, अशी टीका देखील भातखळकर यांनी केली आहे.

तसेच, पोईसर नदी रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या हनुमान नगर व पोईसर येथील कुटुंबाना झो.पु.प्रा.च्या ताब्यातील आप्पापाडा, मालाड पूर्व येथील घरे देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. परंतु, आता तो निर्णय बदलून ती घरे माहुल येथील लोकांना देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मुळात पोईसर नदीच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या पोईसर व हनुमान नगर येथील कुटुंबांना, तसेच उत्तर मुंबई परिसरातील बाधितांना ही घरे प्राधान्यक्रमाने तिथेच द्यावीत, अशा मागण्या आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे आज केलेल्या आहेत, असे भातखलकर यांनी सांगितले.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कशी केली, हे जाणून घ्या थेट डॉक्टरांकडून...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.