मुंबई - शब-ए-बारातला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पक्षाचा पूर्ण विरोध असून मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहन मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना मात्र खुली सूट दिली आहे. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करून आम्ही होळी साजरी करणारच, ठाकरे सरकारमध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिले आहे.
हेही वाचा - 'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'
प्रत्येकांनी होळी साजरी करा, आमचा जाहीर पाठिंबा
होळी हा हिंदूंचा भावनेचा सण असून तो प्रत्येक हिंदूने साजरा केलाच पाहिजे आणि तो साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू व अशा सणांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊ, असे यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोना नियमांचे उल्लंघन करून माहीम कोळीवाड्यात होळी साजरी