ETV Bharat / state

नालेसफाई नाही ही तर हातसफाई, आमदार शेलार यांची महापौरांवर टीका - मुंबई महापालिका निवडणूक बातमी

मुंबई शहरातील 107 टक्के नाल्याचंची सफाई झाल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. यावर ही नालेसफाई नाही ही तर हातसफाई केली असल्याची टीका आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

आमदार शेलार
आमदार शेलार
author img

By

Published : Jun 7, 2021, 6:48 PM IST

Updated : Jun 7, 2021, 7:14 PM IST

मुंबई - राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात मुंबईची होणारी परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. मुंबई शहरातील 107 टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (दि. 7 जून) आमदार आशिष शेलार यांनी शहरातील नाल्यांची पाहणी केली. ही नालेसफाई नाही, तर हातसफाई केली आहे, अशी घणाघाती टीका आमदार शेलार यांनी यावेळी केली.

बोलताना आमदार शेलार

मुंबईत नालेसफाई झालीच नाही. नाल्यात गाळ रुतलेला आहे. गाळाचे बेट तयार झाली आहेत. नाल्यावर शेती करावी अशी झाडे-झुडपे अभी आहेत. शंभर टक्के नालेसफाईचा दावा हा बिल काढण्यासाठी आहे. मुंबईच्या नालेसफाईत आता कट आणि कमिशन दोन्ही सुरू झाले आहे. यात प्रशासनाचे अधिकारीही जबाबदार आहेत.महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचे पी. वेलारासू याला समर्थन आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली आहे.

'महापौरांचा नालेसफाईचा दावा फोल'

मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ खेळत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. दरवर्षी नालेसफाई होतच नाही, पण, पैसे काढले जातात. कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेकडून नालेसफाई 107 टक्के केली असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई पाहताना तो फोल असल्याचे शेलार म्हणाले.

हेही वाचा - मराठा आरक्षणासह विविध मुद्यांवर मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींची घेणार भेट - वळसे पाटील

Last Updated : Jun 7, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.