मुंबई : राज्यात सतत सत्तेसाठी तमाशे सुरू आहेत. राज्यातील जनतेला कंटाळली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत आपण पालिकांच्या सत्तेत असणार, असे भाकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मनसेच्या वाट्याला गेल्याने त्यांचे मुख्यमंत्री पद गेल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेलाही दानवे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले.
राज ठाकरे यांच्या भाषणावर खिल्ली : कावळ्याच्या शापाने असे काही होत नसते. कावळे शाप देत असतात, म्हणून त्याची चिंता करायची गरज नसते, असा चिमटा दानवे यांनी राज ठाकरे यांना काढला. तसेच, लवकरच महापालिकांमध्ये सत्तेत येऊ या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर 'मुंगेरीलाल के हसीने सपने', एवढंच समर्पक उत्तर त्यांना असल्याचे दानवे म्हणाले. तसेच, मनसे आता भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधला गेलेला आहे. कसब्यामधील निवडणुकीत त्यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. आजवर त्यांचे जे वक्तव्य, सगळ्या गोष्टी आहेत, त्या भाजपला खुलेपणे समर्थन देणारे असल्याची टीका दानवे यांनी केली. आमदार, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भाषणावर मिश्किल हास्य करत खिल्ली उडवली.
काय म्हणाले राज ठाकरे : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, तुमच्यासारखे लोक मला लाभले, हे भाग्य समजतो. आज 17 वर्षाकडे आपली वाटचाल गेली आहे. या वर्षात अनेक आंदोलन केली. पाकिस्तानातील कलावंतना हाकलून देण्याचे काम मनसेने केले. तेव्हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून होणारे चिंतन करत होते, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. नुसती जपमाळ करणे म्हणजे हिंदुत्व आहे का, असा सवाल ही त्यांनी यावेळी विचारला. टोलनाके मशिदीवरील भोंगे आदी अनेक आंदोलन उभी केली. भरतीनंतर ओहोटी येथे भाजपने हे विसरू नये असा चिमटा देखील भाजपला यावेळी काढला. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण सत्तेत असू, असा विश्वास व्यक्त केला होता