ETV Bharat / state

Aaditya Thackeray Challenged CM : मुख्यमंत्री शिंदेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; आदित्य ठाकरेंचे आव्हान - Union Budget 2023

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. दोघांनीही आमदारकीचा राजीनामा देऊ आणि त्यांनी माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 4, 2023, 7:22 PM IST

Updated : Feb 4, 2023, 8:02 PM IST

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी या असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल आणि त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यांनी वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

  • #WATCH | I've challenged this unconstitutional CM (Eknath Shinde) to contest the Assembly elections against me. I will resign from my seat & he should resign from his seat, and let him contest from Worli against me: Shiv Sena leader Aaditya Thackeray #Maharashtra pic.twitter.com/pp0X39H7QE

    — ANI (@ANI) February 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशा : केंद्र शासनाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. यानंतर आज मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प 2023 प्रस्तुत करण्यात आला. याविषयी बोलताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपाचा अर्थसंकल्पावर आमची नजर होती असे सांगत केंद्राच्या बजेट मध्ये मुंबई पुणे महाराष्ट्राला काही मिळाला नाही, असे निरीक्षण नोंदवत केंद्र सरकारवर टीका केली.

नवीन मोठा प्रोजेक्ट नाही : महापालिकेच्या बजेटमध्ये मुंबईकरणाकडून ज्या सूचना मागवल्या मी सूचना दिल्या होत्या की, नवीन योजना जाहीर करू नये. आमचा पहिला विजय झाला आहे यात कोणता बिग बजेट योजना नाही. नगरसेवक आणि महापौरांचा तो अधिकार आहे. आपला दवाखाना आमचा प्रोजेक्ट होता. मुंबई महापालिकेचा ५० हजार कोटींचा बजेट आज सादर झाला. नवीन मोठा प्रोजेक्ट नाही पण नवीन खर्च नाही. हे वर्षा बंगल्यावर छापून कॉन्ट्रॅक्टरचे बजेट आहे. रस्त्यांचे बजेट २ हजार कोटींचे असते ते आता सात हजार कोटींचे केले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. रस्त्यांच्या टेंडर वर महानगर पालिका कोणाला फसबत आहे यावर ब्लॅक पेपर निघावा. सौंदर्यीकरणावर साडेसातशे कोटी रुपये दिले. हे अधिकार आयुक्तांना आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

ही तर पैशाची उधळपट्टी : लोकप्रतिनिधींना न विचारता पैसे खर्च केले जात आहेत. स्काय वॉकवर ७५ कोटी रुपये खर्च केले जात आहे. पण स्कायवॉक खराब दिसतात. आयुक्तच खर्च प्रस्ताव देत आहे आणि मान्य करत आहे. मुंबईत लोकशाही राहिली आहे का नाही? आजचे आयुक्तांचे भाषण म्हणजे वर्षा बंगल्यावरून आले आहे. मुंबईच्या पैश्याची उधळपट्टी सुरू आहे. यातच उत्पन्न कमी झाल्याचे स्वतः आयुक्तांना सांगितले असल्याचे आदित्य ठाकरे पत्रपरिषदेत म्हणाले.

मुंबईवर कटोरा घेण्याची वेळ : ५०० फूट पर्यंतच्या घराचा टॅक्स माफ करण्यात आला हे शिवसेनेचे वचन होते. साडेतीनशे कोटी रुपये कमी झाले. पण यामुळे उत्पन्न कमी झाला असे सांगत आहेत. दिल्लीच्या दरवाज्यावर मुंबईला कटोरा घेऊन सरकारला उभे करायचे आहे.

किती पैसे वापरणार हे सांगा : शिवसेना 1977 मध्ये सत्तेत आल्यानंतर मेहनतीने राज्याच्या सत्तेत आली. मुंबईकरांचा पैसा वापरून कोस्टल रोड बीएमसी बनवत आहे. या एफडीमुळे कोस्टल रोडवर कर न लावता बनविता येऊ शकला. २ साडेसात हजार कोटी राज्य सरकारला मनपाला द्यायचे आहेत. ते देणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा : Satyajeet Tambe : मी अपक्षच राहून कार्य करणार; सत्यजित तांबेंचे स्पष्टीकरण

Last Updated : Feb 4, 2023, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.