ETV Bharat / state

कोरोनावर मात करणाऱ्या 137 जणांचे मंत्री आदित्य ठाकरे, महापौरांकडून कौतुक

वरळी येथील तब्बल 137 जण कोरोनावर मात करुन विजय मिळवला आहे. त्यांचे आमदार आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी कौतूक केली.

mumbai
रुग्णांची गर्दी
author img

By

Published : May 10, 2020, 1:33 PM IST

मुंबई - मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वरळी विभागात आहेत. या विभागातील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील क्वारंटाईन सेंटरमधून कोरोनावर यशस्वीरित्या मात करून 137 योध्ये बाहेर पडले. या योद्ध्यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी स्वतः वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे उपस्थित राहून या सर्वांना धीर दिला तसेच टाळ्यांच्या कडकडाटात या सर्वांचे कौतुक केले.

टाळ्या वाजवत स्वागत करताना महापौ किशोरी पेडणेकर व अन्य

महापौर किशोरी पेडणेकर उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आपण सर्व 137 कोरोनाबाधितांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे योग्य ते उपचार करण्यात आले. यामध्ये जी दक्षिण विभागातील 95 जणांचा समावेश आहे. कोरोनावर मात केलेल्यांमध्ये 84 वर्षीय वृद्ध महिलेपासून ते दहा वर्षीय लहान बालकांपर्यंतचा समावेश असल्याचे महापौरांनी सांगितले.

आज आपण याठिकाणाहून जरी बाहेर पडत असला तरी आपल्या घरी आपण 14 दिवस विलगीकरण राहणे आवश्यक असल्याचे महापौर म्हणाल्या. आपण आपल्या घरीच राहून सुरक्षित रहा तसेच इतरांनाही सुरक्षित ठेवा असे आवाहन महापौरांनी यावेळी उपस्थितांना केले.

हेही वाचा - टोमॅटोवरील विषाणू नियंत्रणाला शासकीय दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका; विद्यापीठ आणि कृषी विभागाचे तू- तू- मै- मै

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.