ETV Bharat / state

"मियावाकी"प्रकारची शहरी वने राज्यातील प्रत्येक शहरांत व्हावीत- आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध ६४ ठिकाणी टप्प्याटप्प्याने 'मियावाकी' वनांची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत २४ मियावाकी वनांमध्ये तब्बल १ लाख ६२ हजार ३९८ झाडे बहरली आहेत, तर येत्या काळात आणखी ४० मियावाकी वने विकसित होणार आहेत.

"मियावाकी"प्रकारची शहरी वने
"मियावाकी"प्रकारची शहरी वने
author img

By

Published : Feb 5, 2021, 1:46 AM IST

मुंबई - मुंबईत विकासकामांमुळे आणि बेकायदेशीर बांधकामांमुळे झाडांचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईमधील झाडांचे प्रमाण वाढवण्यासाठी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावता यावीत म्हणून जपानी मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी बोलताना अशा प्रकारची शहरी वने राज्यातील प्रत्येक शहरांत व्हावीत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

३ लाख झाडे लावली जाणार -

उद्यानात आतापर्यंत ५७ हजार झाडे लावण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत आणखी १२ हजार झाडे लावली जाणार आहेत. शहरांमध्ये वने विकसित करून पर्यावरण संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे मुंबईत मियावाकी पद्धतीने कमीत कमी ३ लाख झाडे लावली जाणार आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

आणखी ४० मियावाकी वने -

मियावाकी वनपर्यावरणाला समृद्ध करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची 'मियावाकी' वने विकसित करण्याच्या प्रकल्पाला २६ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध ६४ ठिकाणी टप्प्याटप्प्याने 'मियावाकी' वनांची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत २४ मियावाकी वनांमध्ये तब्बल १ लाख ६२ हजार ३९८ झाडे बहरली आहेत, तर येत्या काळात आणखी ४० मियावाकी वने विकसित होणार आहेत. यावेळी आमदार प्रकाश फातर्पेकर, नगरसेवक मंगेश सातमकर, श्रीकांत शेट्ये, उद्यान उपअधीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वाधिक झाडे भक्ती पार्क उद्यानात -

सर्वाधिक म्हणजे तब्बल ५७ हजार झाडे ही महापालिकेच्या 'एम-पूर्व' विभागातील 'आयमॅक्स' थिएटर जवळच्या भक्ती पार्क उद्यानावरील भूखंडावर आहेत. या खालोखाल 'एल' विभागातील एका भूखंडावर २१ हजार ५२४ झाडे आणि 'पी-उत्तर' विभागातील मालाड पश्चिम परिसरात असणाऱ्या मनोरी गावालगतच्या एका भूखंडावर १८ हजार २०० झाडे आहेत. मियावाकी वनांमध्ये विविध ४७ प्रकारची झाडे लावण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.