ETV Bharat / state

Warali protest : महापुरुषांचा अवमान प्रकरणी वरळी बंदला समिश्र प्रतिसाद - महापुरुषांचा अवमान प्रकरणी वरळी बंद

महापुरूषांबाबतच्या सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे ( constant controversial statements about legends ) आता मुंबईतील वरळी भागात आंबेडकरवादी संघटनांच्यावतीने बंदची हाक ( Bandh call on behalf of Ambedkarist organizations ) दिली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. वरळीतील बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Warali protest
महापुरुषांचा अवमान प्रकरणी वरळी बंदला समिश्र प्रतिसाद
author img

By

Published : Dec 15, 2022, 2:25 PM IST

महापुरुषांचा अवमान प्रकरणी वरळी बंदला समिश्र प्रतिसाद

मुंबई : महापुरूषांबाबतच्या सतत वादग्रस्त वक्तव्याचे लोट ( constant controversial statements about legends ) उसळले असून हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळले जात आहे. नुकताच पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला ( Strict curfew was observed in Pune ) होता. आता मुंबईतील वरळी भागात आंबेडकर वादी संघटनांच्यावतीने बंदची हाक दिली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. वरळीतील बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे.

बंदचे आवाहन : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याबाबत सातत्याने होणाऱ्या चुकीच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर या प्रकरणी शाईफेक करण्यात आली. त्यानंतर भाजपने निदर्शने केली. भाजप आमदार राम कदम यांनी तर घरात घुसून प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. पुण्यात या प्रकरणी कडकडीत बंद पाळण्यात आला. आज वरळीत बंद पाळण्याचे आवाहन आंबेडकर वादी संघटनांनी केले आहे. त्यानुसार सकाळ पासून बंदला समिश्र पाठिंबा मिळतो आहे.

राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा : राम कदम यांच्या विरोधात एफआयआर दाखल करुन घेण्याची मागणी वरळीतील आंबेडकरवादी संघटानांनी केली होती. आज दुपारी जॉइंट सीपी चव्हाण यांच्या कार्यालयात वरळी बंद मागे घेण्यासंदर्भात एक बैठक झाली. यात राम कदम यांच्याविरोधात एफआयआर दाखल करुन घ्या, मग बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका संघटनांनी घेतली होती.

जनतेच्या मनात उद्रेकाची भावना : थोर पुरुषांचा विचार दाबण्यासाठी सातत्याने शासनाचे प्रतिनिधी, राज्याचे मुख्य व्यक्ती प्रयत्न करत आहेत. सगळ्या गोष्टीचा जनतेच्या मनात उद्रेकाची भावना आहे. बंद, मोर्चे, निदेर्शनातून हे उघड होत आहे. राज्य शासनाचे हे अपयश आहे. थोर पुरुषांचे विचार दाबण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला ही चपराक आहे. आदित्य ठाकरेंचे देखील यावर लक्ष आहे. बंदमध्ये सहभागी होतील, आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले.

वरळीकरांचा उस्फर्त प्रतिसाद : आरएसएस पुरस्कृत भाजपने महामानवाबाबत अपशब्द बोलूनही कारवाई होत नाही. दंगल घडवणे हा त्यांचा उद्देश आहे. तरीही राज्यपाल, राम कदमांवर कारवाई ऐवजी पाठिशी घातले जात आहे. महापुरुषांवर अशी विधाने महाराष्ट्र सहन करणार नाही. त्यामुळेच वरळीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. वरळीकरांनी देखील बंदमध्ये सहभाग घेतला आहे, असे आंबेडकरीवादी संघटनेचे मनोज मर्चंडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.