मुंबई - एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत जाण्यासाठी शीडी किंवा दोरीचा वापर करण्यात येतो, असे तुम्ही अनेक चित्रपटांत पाहिले असेल. मात्र, याचे अनुकरण मुंबईतील दोन अल्पवयीन चोरट्यांनी केले एका इमारतीतून दुसऱ्या इमारीतीत प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी शीडीचा वापर केला. चोरी केली मात्र, परतत असताना शीडी तुटली. यामुळे पाचव्या मजल्यावरून पडून एका चोरट्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईच्या चेंबूर परिसरात रविवारी (दि. 20 जून) रात्री दोनच्या सुमारास घडलेली आहे. मोबाईल चोरीच्या उद्देशाने दोन चोर चेंबूरच्या न्यू भारतनगर परिसरातील इमारत क्रमांक 4 आणि 5 च्या जवळ पोहोचले. त्यांनी प्रथम इमारत क्रमांक 4 मध्ये प्रवेश केला तेथून इमारत क्रमांक पाचमध्ये शिरण्यासाठी या चोरट्यांनी दोन्ही इमारतीच्यामध्ये एका लाकडी शीडीचा पुलासारखा वापर केला. रात्रीच्या अंधारत दोन्ही इमारतीच्यामध्ये आडवी शिडी लावली. यातील एक अल्पवयीन चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आडव्या शिडीवरुन रांगत आणि चालत जावून इमारत क्रमांक 5 च्या 503 क्रमांकाच्या घरात प्रवेश केला. घरातील मोबाईल चोरला आणि पुन्हा शिडीवरून परतत लागला. मात्र, लाकडी शीडी तुटली आणि आरोपी पाचव्या मजल्यावरून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा मोठा आवाज झाला. या आवाजामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. एका चोराला रंगेहात पकडले. दुसऱ्या चोराला डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. मात्र, दुसऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन आरोपीवर या पूर्वीही मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - कांदिवलीतील बोगस लसीकरणाचा होणार खुलासा; सिरमकडून मिळालेली माहिती महापालिका पोलिसांना देणार