ETV Bharat / state

आईला उसने पैसे देण्यास नकार; अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची चाकू भोसकून हत्या

सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या आईने शिक्षिका आयेशाकडे यांच्याकडून रेशनिंगसाठी दोन हजार रुपये उसने आणण्यास सांगितले. त्यावर मंगळवारी आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्यांने त्याच्या आईने दोन हजार रुपये उसने मागितले असल्याचे शिक्षिकेला सांगितले. मात्र, यावेळी शिक्षिकेने अगोदर शिकवणीचे पैसे घेऊन ये, असे रागाने सांगितले.

अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची चाकू भोसकून हत्या
author img

By

Published : Sep 18, 2019, 8:23 AM IST

मुंबई - शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेकडून एका अल्पवयीन मुलास त्याच्या आईने उसने पैसे आणायला सांगितले होते. मात्र, संबंधित शिक्षिकेने पैसे न दिल्याने चाकू भोसकून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना गोवंडीत घडली आहे. आयेशा असलम हुशीये (30 ) असे त्या मृत शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिकेची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईवडिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर त्याची रवानगी डोंगरीतील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

खासगी शिवकवणी घेणारी शिक्षिका आयेशा या घटस्फोटीत असून गोंवडीतील शेपणभूमी जवळ गेल्या दोन वर्षापासून वास्तव्यास होत्या. त्यांची दोन्ही मुले घटस्फोटानंतर तिच्या पतीसोबत राहतात. तर स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी त्या राहत्या घरी खासगी शिकवणी घेत होत्या. दरम्यान, शिकवणीला येणाऱ्या सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या आईने शिक्षिका आयेशाकडे यांच्याकडून रेशनिंगसाठी दोन हजार रुपये उसने आणण्यास सांगितले. त्यावर मंगळवारी आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्यांने त्याच्या आईने दोन हजार रुपये उसने मागितले असल्याचे शिक्षिकेला सांगितले. मात्र, यावेळी शिक्षिकेने अगोदर शिकवणीचे पैसे घेऊन ये, असे रागाने सांगितले.

शिक्षिकेने पैसे न देता आधी शिकवणीचे पैसे भरायला सांगितले असल्याचे या विद्यार्थ्याने त्याच्या आईला सांगितले. त्यावेळी आईने परत एकदा विनंती करण्यासाठी सांगून पैसे आणण्यासाठी त्याला पुन्हा शिक्षिकेकडे पाठवले. मात्र, यावेळी विद्यार्थ्याला राग आला होता. तो शिक्षिकेच्या घरी गेला, यावेळी शिक्षिका घरातील किचन काम करत असताना त्याने तेथील चाकू घेवून अचानक शिक्षिकेवर वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना घडली त्यावेली शिक्षिकेच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून स्थानिक रहिवाशांनी शिक्षिकेच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना आयेशा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच्या आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आयेशाला प्रथम गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अधिक रक्तस्राव झाल्याने पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आयेशाचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.

दुसरीकडे मुलाने हत्या केल्याची माहिती मिळताच त्याच्या आई वडिलांनी त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावर पोलिसांनी आरोपी मुलाची चौकशी केली असता, या मुलाने हत्येची कबुली दिली आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.

Intro:शिक्षिकेने आईने उसने मागितलेले पैसे दिले नाही . म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून शिक्षकेची चाकू भोसकून हत्या

गोवंडीत खासगी शिकवणी घेणार्‍या आयेशा असलम हुशीये या 30 वर्षीय शिक्षिकेने आईने उसने मागितलेले पैसे देण्यास नकार दिल्याने तिच्याकडेच शिकवणीसाठी येणाऱ्या बारा वर्षाच्या मुलाने चाकूने वार करून तिची हत्या केली Body:शिक्षिकेने आईने उसने मागितलेले पैसे दिले नाही . म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून शिक्षकेची चाकू भोसकून हत्या

गोवंडीत खासगी शिकवणी घेणार्‍या आयेशा असलम हुशीये या 30 वर्षीय शिक्षिकेने आईने उसने मागितलेले पैसे देण्यास नकार दिल्याने तिच्याकडेच शिकवणीसाठी येणाऱ्या बारा वर्षाच्या मुलाने चाकूने वार करून तिची हत्या केली

शिक्षिकेची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलाला शिवाजीनगर पोलिसाकडे आईवडिलांनी ताब्यात दिल्यानंतर त्याची रवानगी डोंगरीतील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे ही शिक्षिका घटस्फोटीत असून गोंवडीतील शेपणभूमी जवळ गेल्या दोन वर्षापासून राहत होती. तिची दोन्ही मुले घटस्फोटानंतर तिच्या पतीसोबत राहतात उदरनिर्वाहासाठी ती राहत्या घरी खाजगी शिकवणी घेत होती यावेळी 7 व्या वर्गात शिकणाऱ्या या मुलाच्या आईने आयेशाकडे रेशनिंग साठी दोन हजार रुपये उसने टीचर कडून घेऊन येण्यास सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला आईने दोन हजार रुपये मागितले असे सांगितले यावेळी शिक्षिकेने अगोदर शिकवणीचे पैसे घेऊन ये अशी रागात बोलले यावेळी विद्यार्थी परत घरी गेला व आपल्या आईला सांगितला शिक्षिका रागावत आहे देत नाही त्यावेळी आईने परत एकदा विनंती कर सांगितले यावेळी विद्यार्थ्याला राग आला आणि तो शिक्षिकेच्या घरी गेला यावेळी शिक्षिकेच्या घरातील किचनमधील चाकू घेवून अचानक शिक्षिकेवर वार केले यावेळी शिक्षिकेच्या किंचालण्याच्या आवाजाने स्थानिक रहिवाशांनी काय झाले पाहिले यावेळी शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात घरात पडली होती ही माहिती पोलिसांना देण्यात आली यावेळी पोलिसांनी आयेशाला प्रथम गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर अधिक रक्तस्राव झाल्याने पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी उपचारादरम्यान आयेशाचा मृत्यू झाला शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून प्राथमिक चौकशीत या मुलाने हत्येची कबुली दिली आहे.पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.

Byt:: सुशील कांबळे तपास अधिकारी शिवाजीनगर पोलीस ठाणेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.