मुंबई - राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, त्या मंत्रालयात चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारने गांभीर्याने पावलं उचलली आहेत. मंत्रालयात निर्जंतुकीकरणाचे काम करण्यासाठी उद्यापासून दोन दिवस मंत्रालय बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरणासाठी २९ आणि ३० एप्रिलला मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम २९ व ३० एप्रिलला करण्यात येणार आहे.
निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय दोन दिवस बंद! - state ministry sanitization
कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.
![निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय दोन दिवस बंद! Ministry closed for two days from tomorrow for sanitization](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6975008-677-6975008-1588069925032.jpg?imwidth=3840)