ETV Bharat / state

HSC Exam Date : १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... - वर्षा गायकवाड १२वी परीक्षा तारीख

राज्यात बऱ्याच ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असून ते बघता दहावी आणि बारावीच्या ( SSC And HSC Exam ) पूर्वनियोजीत परीक्षा पुढे ढकलल्या जाणार का, असा प्रश्न निर्माण झालेला असताना याबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Varsha Gaikwad Spoke About HSC Exam ) भूमिका जाहीर केली आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jan 30, 2022, 6:42 PM IST

मुंबई - राज्यात बऱ्याच ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असून ते बघता दहावी आणि बारावीच्या ( SSC And HSC Exam ) पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलल्या जाणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Varsha Gaikwad Spoke About HSC Exam ) 15 फेब्रुवारीपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं सांगितलं आहे.

सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय -

राज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती पाहता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू ( Minister Bacchu Kadu on School Reopening ) यांनी परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात असे सांगितले होतं. याविषयी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यमंत्र्यांशी याबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जातो आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेऊ. पुढे त्या म्हणाल्या, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे पुरवणी परीक्षा असते. कोरोनामुळे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकले नाहीत. त्यांना पुरवणी परीक्षेस बसवावे लागेल. अशा एकावर एक गोष्टी अवलंबून असतात. त्यानंतर अकरावीचे प्रवेश असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. अभ्यासक्रमाच्या संदर्भात आम्ही शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा करत आहोत, असंही त्या म्हणाल्या. १५ फेब्रुवारीपर्यंत आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतो आहे. शिक्षक संघटना, शिक्षक तज्ञ, मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवून निर्णय घेतला जाईल, असे सांगत सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि ऑफलाईन परीक्षा होतील, अशी शक्यता आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

'गांधीजींचे विचार गोळीने संपवू शकत नाहीत' -

Why I Killed Gandhi? हा महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे. या विषयी बोलताना अहिंसा मानणाऱ्या गांधीजींचे विचार गोळीने संपवू शकत नाहीत. हे जगाने मान्य केले आहे. सिनेमा येतोय, पण या अशा विचाराला प्रोत्साहन दिलं जात आहे. पंतप्रधान सातत्याने महात्मा गांधींचा उल्लेख करत असतात, असा टोला लगावत चित्रपटात नथुराम गोडसे याची भूमिका साकारणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आत्मक्लेशाचा निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा - Nana Patole On Gandhi Killing : नाना पटोले म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा 'वध' केला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.